वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? असा प्रश्न निर्माण(wealthy) झाला आहे,असे विधान ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी केले आहे. वंचित आघाडीने विशाल पाटील यांना दिलेल्या पाठिंब्यानंतर प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकरांवर जोरदार निशाणा साधला.
वंचितचा पक्ष वंचितांसाठी(wealthy) आहे की धनदांडग्यांसाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणत ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला. तसेच घनदांडगे प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांना भेटले आणि एका तासात काय घडलं,की त्यांनी विशाल पाटलांना आणि सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला,असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ओबीसी, बहुजन, मागासवर्गीय या सर्वांनी मिळुन सुरू केलेली चळवळ एकत्रित चालवली तर चालू शकेल अन्यथा धनदांडगे चळवळीचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाहीत, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी पुनश्च एकदा विचार करून आपला निर्णय मागे घ्यावा,असे आवाहन देखील प्रकाश शेंडगेनी केले आहे. तर आनंदराज आबेडकर यांनी प्रकाश शेडगे याना सांगली लोकसभेसाठी पाठिबा दिल्याची माहिती प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, सांगली लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने सुरूवातीला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र सांगलीचे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचे बंधु प्रतिक पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी निर्णय बदलून विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
हेही वाचा :
सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत
डीपफेक’ ओळखणं होणार सोप्प! ‘एक्स’वर येतंय नवं फीचर
महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल