कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : प्रचार करण्याचा, विरोधकांवर टीका करण्याचा, पुरावे(active campaign) असतील तर गंभीर आरोप करण्याचा, इतरांच्या तुलनेत आपण किती उजवे आहोत, आपला पक्ष किती समाज हितैषी आहे, हे सांगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. संविधानाने तसे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला दिले आहे. पण उपलब्ध व्यासपीठ समोर गर्दी दिसली किंवा प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काय बोलायचे आणि काय बोलू नये याचे तारतम्य ठेवणे गरजेचे असते. राज्याचे विरोधी पक्ष नेते, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना त्याचे भान असते तर त्यांनी पोलीस तपास यंत्रणा, सरकारी वकील या प्रस्थापित व्यवस्थे बद्दल संशय व्यक्त करून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले नसते. आपण केलेले वक्तव्य हे वादग्रस्त होत असल्याचे दिसतात त्यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईवर झालेला 26/ 11 चा दहशतवादी हल्ला, त्यात 164 व्यक्तींची त्यांचा कोणताही(active campaign) दोष नसताना करण्यात आलेली हत्या, तीनशे पेक्षा अधिक जखमी झालेले लोक, हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे या अधिकाऱ्यांची झालेली हत्या, जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल कसाब हे एकूण प्रकरण संवेदनशील, द्विराष्ट्र संबंधित होतेच शिवाय सार्वभौम्य राष्ट्राशी युद्ध पुकारणे असे होते. या खटल्यात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून जेष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी काम पाहिले. अजमल कसाबला फाशीची शिक्षा होऊन ती अमलातही आणली गेली. मुंबई शहराला, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला झालेली 26/ 11 ची जखम वाळली होती. तिच्यावर खपली धरली होती. पण या जखमेवरची खपली विजय वडेट्टीवार यांनी काढली आहे. या जखमेतून भळभळणाऱ्या रक्ताचे भांडवल लोकसभा निवडणुकीत करण्याचा त्यांचा प्रयत्न फारसा कुणाला रुचलेला नाही.
उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठविधीज्ञ उज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी 26/ 11 चे प्रकरण प्रचाराचा मुद्दा म्हणून पुढे आणले आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या ह्या दहशतवाद्यांच्या अग्नीशास्त्रातील नव्हत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या अग्निशस्त्रातील त्या होत्या ही बाब उज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवली असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विशेष म्हणजे
26 /11 च्या दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू असताना राज्यात आणि केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. या सरकारनेच उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती.
विशेष सरकारी वकील हे तपास अधिकारी(active campaign) नसतात किंवा त्यांना तसा तो अधिकारही नसतो. फार झाले तर ते तपास यंत्रणेला काही सूचना करू शकतात असे म्हणता येईल. “हू किल्ड करकरे”या पुस्तकाचा आधार घेऊन आरोप करताना आपण पाकिस्तानच्या हातात चर्चेसाठी एक मुद्दा उपलब्ध करून देत आहोत याचेही भान त्यांना राहिलेले दिसत नाही. सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी शमसुद्दीन मुश्रीफ यांना उपलब्ध झालेल्या माहितीवरून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्याबद्दल हरकत घ्यावी असे नाही. त्यांनी काही नवीन मुद्दे पुढे आणले असतील तर ते विचारात घेणे इष्ट ठरते. मात्र ते हेमंत करकरे यांनाच अधोरेखित करतात.
अशोक कामटे, विजय साळसकर यांचा सुद्धा या हल्ल्यात बळी(active campaign) गेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शमशुद्दीन मुश्रीफ हे पुस्तक लिहून मोकळे झाले आहेत. त्यानंतर या पुस्तकावर त्यांनी अनेक व्याख्यानेही दिली आहेत. पण हेमंत करकरे यांना मरणोत्तर न्याय मिळण्यासाठी ते न्यायालयात जात नाहीत. 26/ 11 चा खटला सुरू असताना त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांना न्यायालयाला देता आली असती. मुद्दा त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा नाही. तर या पुस्तकाचा आधार घेऊन विजयी वडट्टीवार यांनी तो प्रचाराचा मुद्दा केल्याबद्दलचा आहे.
काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील उमेदवार वर्षा गायकवाड आहेत. आणि त्यांच्या विरोधात भाजपच्या वतीने उज्वल निकम उभे आहेत. त्यांना कोणत्या पक्षातून निवडणूक लढवावी याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. 26/ 11 चा खटला चालवताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील. पण अशा संवेदनशील प्रकरणाचा निवडणूक प्रचारासाठी भांडवल म्हणून वापर करणे याचे समर्थन करता येणार नाही. आता त्यांनी हे माझे मत नाही तर पुस्तकाचा आधार घेऊन मी बोललो आहे अशी सारवासारव केली आहे.
हेही वाचा :
एक, दोन नाही तर चार वेळा धडपडली काजोल Video Viral
हातकणंगले मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंची ऑफर काय होती अन्… ? राजू शेट्टी
गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा ‘हे’ बदल