महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली(shadow it) दिवस असणार आहेत. आपल्या सोबत वर्षभर राहणारी सावली या दिवशी काही मिनिटांसाठी आपली साथ सोडून जाणार आहे.भौगोलिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या हे दिवस महत्त्वाचे असून, विद्यार्थी व नागरिकांनी भौगोलिक घटनांचा अभ्यास, निरीक्षण करावे, असे आवाहन खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.
अंदमान-निकोबार बेटावर इंदिरा पॉइंट येथे ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर येतो आणि शून्य सावली(shadow it) अनुभवता येतो. १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस असतो.दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मेपर्यंत विविध अक्षवृत्तांवर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो. शेवटी भोपाळजवळ १८ जून रोजी शून्य सावली दिवस पाहता येतो.
कसे कराल निरीक्षण
-दुपारी १२ ते १२.३५ या वेळेदरम्यान सूर्य निरीक्षण करावे.
-समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल.
आवश्यक साहित्य
दोन-तीन इंच व्यासाचा, एक- दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाइप, कोणतीही उभी वस्तू ठेवावी किंवा स्वतः उन्हात सरळ उभे राहावे. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही. सावलीने थोडा वेळ का होईना साथ सोडलेली असेल.
हेही वाचा :
लोकसभा निवडणूक प्रचारात “व्यवस्थे”वरच संशय व्यक्त
एक, दोन नाही तर चार वेळा धडपडली काजोल Video Viral
हातकणंगले मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंची ऑफर काय होती अन्… ? राजू शेट्टी