माझ्या विश्वविक्रमी 400 धावांना गाठण्याची क्षमता पुणात (pune)असले तर ती हिंदुस्थानच्या यशस्वी जैसवालच्या बॅटीत आहे. हा डावखुरा फलंदाजच माझ्या विश्वविक्रमाला मागे टापू शकतो, असे भाकीत वर्तवलेय खुद्द विश्वविक्रमवीर ब्रायन लाराने.
लारा सध्या जैसवालच्या प्रेमात आहे. तो फॉरमॅटनुसार आपल्या फलंदाजीतही एका क्षणात बदल करतो. त्याचा हाच अंदाज ब्रायन लाराला आवडलाय. माझ्या विक्रमला जर पुणापासून धोका असेल तो आहे यशस्वी जैसवाल. माझा विश्वविक्रम मोडण्याची क्षमताही त्याच्या फलंदाजीत आहे आणि सध्या फॉर्मातही आहे. त्याने दोन दिमाखदार शतकेही नुकतीच ठोकली आहेत. तब्बल 20 वर्षांपूर्वी लाराने इंग्लंडविरुद्ध 400 धावांचा विश्वविक्रम रचला होता, जो दोन दशकांनतरही अबाधित आहे.(pune)
लारा पुढे म्हणाला, गेल्या वर्षी यशस्वी आणि माझी पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीत तो जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करत होता. तो चांगला खेळाडू कसा होऊ शकतो, यासंदर्भात ती बैठक होती. ज्याच्याकडे माझा नंबर आहे, त्या सर्वांसाठी मी उपलब्ध आहे. तो डावखुरा असल्यामुळे मी त्याच्याकडे वळलो. लोक मला याबाबतीत पक्षपाती मानतील, मलाही त्यात गैर वाटणार नाही. मी डावखुरा आणि तोही डावखुरा, त्यामुळे असे होणारच, असेही लारा म्हणाला. माझा 400 धावांचा विश्वविक्रम असाच फलंदाज मोडू शकतो, जो जास्तीत जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकतो आणि वेगाने धावाही काढू शकतो. हे दोन्ही गुण यशस्वीमध्ये ठासून भरलेत. त्याची धावांची भूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जो विश्वविक्रम गेली 20 वर्षे मोडला गेला नाही, मात्र तो दिवस आजही मी पाहण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.
गोलंदाजीच्या आक्रमणाच्या चिंधडय़ा उडवणाराच मोडेल विक्रम
गेल्या काही वर्षांत वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, मॅथ्यू हेडन, सनथ जयसूर्यासारख्या फलंदाजांनी गोलंदाजांच्या चिंधडय़ा उडवत 300 पेक्षा अधिक धावांचा टप्पा गाठला आहे. जो गोलंदाजांवर तुटून पडेल तोच या विश्वविक्रमाच्या समीप असेल. जैसवालसुद्धा असाच आक्रमक आहे. मला वाटते की, हा विश्वविक्रम येणाऱया काळात लवकरच मोडला जाईल. फक्त त्या फलंदाजाचे नशीब असायला हवे. सर्व गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्यात. मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय. मला पूर्ण विश्वास आहे की, मी तेव्हा आसपासच असेन, असेही लारा म्हणाला.
हेही वाचा :
गर्भपातानंतर कन्सिव्ह करणं कठीण, 41 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री झाली आई!
सांगलीचा वाद मिटेना! नाना पटोलेंचा संजय राऊतांना थेट इशारा; नेमकं काय म्हणाले?