राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात(banners) कोण बाजी मारणार? याबाबत कार्यकर्त्यांच्या मध्ये अनेक पैजा लागले आहेत. अशातच मतांची बेरीज करण्याचं काम सुरू आहे. मतदानाची आकडेवारी लक्षात घेऊन अनेक अंदाज आणि तर्कवितर्क राजकीय नेत्यांकडून ही लावले जात आहे. अशातच आता कार्यकर्तेही मागे राहिलेला नाही.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात(banners) प्रमुख तिरंगी लढत पाहायला मिळाली. मत विभागणी आणि जातीय समीकरणावरच येथे निकाल स्पष्ट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांच्या विजयाचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल करून चर्चेचा विषय केला आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याबाबत असणारी नाराजी उघड-उघड या मतदारसंघात आहे. त्यातच शिंदे गटासोबत गेल्याने खासदार माने यांच्याबाबत निष्ठावंत शिवसैनिकांनी रान उठवले आहे. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढत असल्याने मत विभाजनाचा फटका या ठिकाणी प्रमुख फॅक्टर मानला जात आहे. अशातच महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बांबवडे येथील काही उत्साही कार्यकर्त्यांनी निकाल लागण्यापूर्वीच सत्यजित पाटील सरूडकर यांचे विजय बॅनर सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. सत्यजित पाटील यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन, असा उल्लेख असलेला बॅनर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ताकद पाहता महाविकास आघाडीकडे तीन विद्यमान आमदार आणि पाच माजी आमदार यांचा गट आहे. महाविकास आघाडीकडून प्रामाणिकपणे त्याची पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न केले आहेत. याच उत्साहात कार्यकर्त्यांकडून झालेली बॅनरबाजी हातकणंगले मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा :
ठाकरेंची ‘मशाल’ दहशतवाद्यांच्या हाती; भाजपचा गंभीर आरोप
शरद पवारांचे उमेदवार निवडून आल्यावर मोदींसोबत जाणार -प्रकाश आंबेडकर
सांगलीत एकाच मतदान केंद्रावर चार महिलांच्या नावे बोगस मतदान झाल्याचा संशय