महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल(idp result) काही दिवसांतच जाहीर होणार असून, आता विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. निकालांपूर्वीच्या याच वातावरणात येत्या वर्षी म्हणजेच 2024-25 या शैक्षणिक वर्षादरम्यान जे विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठीची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात(idp result) वाढ करण्यात आली आहे. छपाई आणि स्टेशनरी महागल्यामुळे दहावी बरावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला आहे. हे नवे दर प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा 2025 पासून लागू होणार आहेत.
हेही वाचा :
राजकारणातून संन्यास घ्यायचा, नाहीतर संपवून टाकेन…’ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी
कोल्हापूर : अबब! 500 पासून ते लाखांपर्यंतच्या पैजा; निकालानंतर कुणाचा खिसा गरम होणार तर कुणाचा खाली…