माझ्या परवानगीशिवाय ‘भिडू’ शब्द वापरू नका!

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफचा ‘क्या भिडू…’ हा फिल्मी(filmy) डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. या डायलॉगचा नेहमी सार्वजनिक ठिकाणी वापरही केला जातो. परंतु आता जॅकी श्रॉफने या शब्दावर आपला दावा ठोकत कोर्टाचे दार ठोठावले आहे. दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. माझा फोटो, माझा आवाज आणि ‘भिडू’ या शब्दाचा वापर अन्य कुणाला करायचा असेल तर त्यांनी आधी माझी परवानगी घ्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. माझ्या खासगी आणि पब्लिसिटी अधिकारांचे संरक्षण व्हायला हवे, असे

जॅकी श्रॉफने आपल्या याचिकेत म्हटले आहे. कोर्टाने संबंधितांना निर्देश द्यावेत की, जॅकी श्रॉफच्या परवानगीविना सोशल मीडिया चॅनेल, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स अॅपसह अन्य प्लॅटफॉर्मवर माझ्या परवानगीविना भिडू या शब्दाचा वापर करण्यात येऊ नये, असेही जॅकी श्रॉफने म्हटले आहे. या प्रकरणावर 15 मे रोजी सुनावणी होणार आहे.(filmy)

अनिल कपूरचाही ‘झकास’ शब्दावर दावा
अभिनेता अनिल कपूरनेही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपला पह्टो, नाव, आवाज आणि ‘झकास’ या शब्दाचा वापर करण्याआधी आपली परवानगी घ्यावी, अशी मागणी केली होती.


जॅकी आणि जग्गू दादाचाही वापर नको
जॅकी श्रॉफच्या वतीने अॅड. प्रवीण आनंद यांनी कोर्टात ही याचिका दाखल केली आहे. काही ‘मिम्स’मध्ये जॅकी श्रॉफच्या आवाजाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. जॅकी श्रॉफच्या पात्राचा पोर्नोग्राफीतही वापर केला जात आहे. त्यामुळे जॅकी श्रॉफच्या परवानगीविना जॅकी आणि जग्गू दादा, भिडू या शब्दाचा वापर करण्यात येऊ नये, असे प्रवीण आनंद यांनी म्हटले आहे. गुगलच्या मालकीची पंपनी टेनॉर, जीआयएफ मेकिंग पंपनी जिफी, एआय प्लॅटफॉर्म्सचा उल्लेख करून वकिलाने जॅकी श्रॉफचा आवाज, पह्टो आणि नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे, असे म्हटले आहे.

हेही वाचा :

अर्जही एकाच दिवशी अन् सभेची तारीखही एकच; ‘शिवाजी पार्क’साठी मनसे- ठाकरे गटात रस्सीखेच!

तरुणांची लग्न करणं हेच माझं लक्ष्य; वंचितच्या उमेदवाराची अफलातून घोषणा

‘शरद पवारांनी आदेश दिला तर मी..’; पृथ्वीराज चव्हाण अगदी स्पष्टच बोलले! राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट