मुंबईत महायुतीचं ‘शक्ती’ प्रदर्शन, मोदींचा ‘रोड शो’

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष घातलं आहे.(power) त्याचाच परिणाम म्हणून मोदी आणि शाहांच्या प्रचारसभांचा धडाका लावला आहे. पाचव्या टप्प्यात होत असलेल्या मतदानाच्या धर्तीवर नाशिक, कल्याणमधील सभेनंतर आता पंतप्रधान मोदींचा मुंबईत मेगा रोड शो होत आहे. पण या रोड शोमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतील घाटकोपर अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रीजपर्यंत असा अडीच किलोमीटरच्या ‘रोड शो’चं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. या रोड शोसाठी महायुतीने कंबर कसली आहे.स्वत:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या नेत्यांनी या रोड शोसाठी जोरदार तयारी केली आहे.

पण एकीकडे महायुती या रोड शो च्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र या रोड शोत दिसून आले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौथ्या टप्प्यांपर्यंत प्रचारसभांचा धडाका लावला होता. त्यांनी बीड, चाकण, शिरूर,पुणे अशा विविध ठिकाणी सभांद्वारे महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते.पण गेल्या दोन तीन दिवसांपासून अजित पवार प्रचारात सक्रिय नसल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यातच आता ते मुंबईतील मोदींच्या रोड (power) शोमध्येही सहभागी होत नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.मात्र. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोदींच्या रोड शो मध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 19 सभा झाल्या आहेत.नाशिक आणि कल्याणमधील सभेनंतर त्यांची 17 मे रोजी मुंबईत जाहीर सभा होणार आहे.यापूर्वी त्यांचा आज भव्य रोड शो होत आहे.शिवसेनेतील फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यात उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानेच भाजपसह महायुतीने मुंबईतील सहाही जागांसाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

‘असा’ असणार ‘रोड शो’!

घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू झाला आहे. तो एम जी रोडवरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर करत तो घाटकोपर पूर्वमध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होणार आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत काही दिवसापासून आढळून येत आहेत कचऱ्याचे साम्राज्य …

उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

शांतोकडेच बांगलादेशचे नेतृत्व, टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर