आरटीई प्रवेशासाठी मार्गदर्शक सूचना जारी

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी येत्या 17 ते 31 मे या कालावधीत ऑनलाईन (online)प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या बालकाच्या पालकांना पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. यापूर्वी केलेला अर्ज यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतला जाणार नाही, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी.

अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल, याची दक्षता घेण्यात यावी.(online)

प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत पेंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे.

ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई 25 टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.

यापूर्वी 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल.

पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नयेत

हेही वाचा :

एप्रिल महिना सिनेरसिकांसाठी ठरणार खास, ३ जबरदस्त चित्रपट येणार भेटीला

वानखेडेमध्ये आज खरंच हार्दिकमुळे पोलीस चाहत्यांवर कारवाई करणार? MCA म्हणालं, ‘प्रेक्षकांच्या..’

‘शरद पवारांनी आदेश दिला तर मी..’; पृथ्वीराज चव्हाण अगदी स्पष्टच बोलले! राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट