2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला यावेळी 220 च्या वर मजल मारता येणार नाही तर एनडीएतील इतर घटक पक्षांना केवळ 35 जागा मिळतील, असा दावा करतानाच हुकूमशहाची अखेर बेडया किंवा शवपेटीतच होतो अशा परखड शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे पती आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांनी मोदी (modi)सरकारचा अंत जवळ असल्याचे म्हटले आहे. द वायर या वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इतिहासाचा दाखला देत हुकूमशहाची अखेर कधी ना कधी तरी होतेच याचे विश्लेषण आकडयानीशी केले.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी(modi) यांच्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दाच नव्हता. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात एका बाजूला हिंदू आणि मुस्लिम तर दुसऱया बाजूला बेरोजगारी, भ्रष्टाचार, दारिद्रय़ असे मुद्दे होते. त्या भाषणाचा प्रभाव लोकांवर पडला. त्यावेळी हिंदुस्थानात भ्रष्टाचाराविरोधात संताप होता. त्यामुळे मध्यमवर्गीय, गरीब, सुशिक्षित तरुण हे भाजपासोबत गेले आणि मोदींची एक लाट आली. या लाटेसोबतच घटकपक्षांची मतही मिळाली. 1998 मध्ये असलेली 25 टक्के मते पुढे 29 टक्क्यावर गेली. त्यानंतर बालाकोट आणि पुलवामा हल्ल्याच्या मुद्दय़ावरआणखी 4 ते 5 टक्क्यांची भर पडली. मात्र आता भ्रष्टाचार वाढलाय, इलेक्टोरल बॉण्डचा मुद्दा तापला. त्यामुळे भाजपाची मतांची टक्केवारी पुन्हा घसरल्याचे निरीक्षण परकला प्रभाकर यांनी नोंदवले.
भाजपाने यावेळी हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने पुढे आणला. त्यामुळे बेरोजगारी, दारीद्र्य, भ्रष्टाचार यांसारखे मुद्दे मागे पडले. उलट इलेक्ट्रोल बॉण्ड, आर्थिक असमानता, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढल्याचे यावेळी समोर आले. हे लक्षात घेतले तर सुशिक्षीत बेरोजगार, मध्यमवर्गीय भाजपासून दूर गेले असून यावेळी भाजपचा पुर्णपणे निःपात होईल, अशी शक्यता परकला प्रभाकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात होणार गेम
2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एनडीएला 48 पैकी 42 जागा मिळाल्या होत्या. यावेळी एनडीएला केवळ 23 जागा मिळतील. येथे भाजपला 19 जागांवर फटका बसेल. म्हणजेच 50 टक्के जागांवर नुकसान सहन करावे लागेल. म्हणजेच महाराष्ट्रात एनडीएचा गेम होईल.
हेही वाचा :
महिना 50 हजार देऊन हिंदुंना ख्रिश्चन बनवण्याचा प्लान असा फसला
खरंच परिणीती चोप्रा प्रग्नेंट आहे का?, अभिनेत्रीने VIDEO शेअर करत सांगितलं सत्य
अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?