मुंबई ते नाशिक, एका बॅगेचा झालेला हेलिकॉप्टर प्रवास!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बॅग हा तसा मुद्दाम लक्ष जावे असा प्रकार नाही. कारण तो माणसाच्या(helicopter) हातात रोज किंवा अधून मधून,प्रसंगान्वये येतच असतो. पण तीच बॅग कोणाची आहे? कोणासाठीची आहे? कोणाच्या हातात आहे? यावरून त्या बॅगेचे महत्त्व वाढत असते. आता तर अगदी सामान्य माणसाचे महत्व वाढवणारी “व्हीआयपी”बॅग बाजारात आणली गेली आहे.

आता काही बॅगांच्या(helicopter) नशिबी साधे चार चाकी वाहन असते, काही बॅगांना रेल्वेत स्पेशल शयन कक्ष मिळतो. तर काही बॅगा विमानात, हेलिकॉप्टर मध्ये स्थान मिळवत असतात. तर अशाच एका बॅगेचा मुंबई ते नाशिक असा हेलिकॉप्टरने उडत उडत प्रवास झाला. आणि तोही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत. गुरुवारी अशाच बॅगेने समस्त वृत्तवाहिन्यांवर दिवसभर धुमाकूळ घातला होता.

सध्या लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीची धामधूम सुरू आहे. नाशिक या बहुचर्चित मतदार संघाचे हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक मध्ये मुक्कामच असल्यासारखा आहे. दोन दिवसांपूर्वी ते असेच प्रचारासाठी म्हणून नाशिकमध्ये आले तेव्हा विमानतळावरून पंचतारांकित हॉटेलपर्यंतचा त्यांचा प्रवास स्पेशल कार मधून झाला. त्यांच्या कारमधून हॉटेलमध्ये नेण्यात आलेल्या काही बॅगांवर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवला. निवडणूक खर्चासाठी करोडो रुपये त्यांनी या बॅगांमधून आणले असे त्यांना म्हणावयाचे होते.

गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईहून नाशिकला हेलिकॉप्टरने आले. त्यांच्यासोबत आणखी काही व्यक्ती होत्या. त्यापैकी एका व्यक्तीच्या हातातील मोठी बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आणि हेलिपॅड परिसरातच तिची झडती घेतली म्हणजे तपासणी केली. पण त्यात आक्षेप घ्यावा असे काहीच सापडले नाही. आता चक्क मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगेची अगदी उघडपणे तपासणी केली जाते म्हटल्यावर खळबळ तर उडणारच, आणि तशी ती उडाली सुद्धा. या बॅगेने दिवसभर वृत्तवाहिन्यांचे फुटेज खाल्ले. आता त्यावर संजय राऊत, अंबादास दानवे यांच्या प्रतिक्रिया येणारच. तशा त्या तात्काळ आल्याही. नौटंकी, स्टंट अशी काही विशेष नाही त्यांनी या बॅग तपासणी प्रकाराला लावली.

रस्त्यावर(helicopter) एखादी बेवारस बॅग आढळते. कुणीतरी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देते. मग बॉम्ब तज्ञ पथक येते. परिसर नियर मनुष्य केला जातो. पथकातील तज्ञ ती बॅग ओपन करतात. आत मध्ये सामान्य प्रवासी साहित्य आढळते. पण तरीही ही सामान्य बॅग काही तासांच्या साठी विशेष आणि असाधारण बनते. डोंगर पोखरला, काय निघाले? असा प्रश्नार्थक चेहरा करून बॅगेपासून दूर असलेली गर्दी ओसरते. नाशिकच्या हेलिपॅड वर अशीच गर्दी जमली होती कारण ज्या बॅगेची तपासणी सुरू होती की मुख्यमंत्र्यांची होती. आता त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. ही बॅग प्रचाराचा एक प्रमुख मुद्दा ठरली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जगातील कोणत्याही देशाच्या दौऱ्यावर येतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये एक लॅपटॉप च्या आकाराची छोटीशी बॅग असते. या बॅगेत नेमके काय असते? याचे कुतूहल सर्वसामान्य माणसाला नेहमीच पडत आलेले आहे. या बॅगेमध्ये काही अतिशय महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक बटणे असतात. ती देशाच्या सुरक्षा व्यवस्थेची असतात. म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे नेहमीच आपल्या सोबत अमेरिकेची सुरक्षा व्यवस्था ठेवत असतात. म्हणून त्या बॅगेचे महत्व शब्दात सांगता येत नाही.

काही वर्षांपूर्वी अशीच एक बॅग दिल्लीच्या सत्ता वर्तुळात गाजलेली होती. शेअर मार्केट मधील एक दलाल हर्षद मेहता यांने तत्कालीन पंतप्रधानांना आपण एका बॅगेतून शंभर कोटी रुपये दिले होते असा सणसणाची आरोप केला होता. त्यांने ती बॅगही दाखवली होती. त्या बॅगेत 100 कोटी रुपयांची रक्कम बसते का? याचा एक डेमो दाखवून हर्षद मेहताचा
तो आरोप किती बिन बुडाचा होता हे समस्त देशासमोर आणले गेले होते. एकूणच एरवी सामान्य वाटणारी बॅग
कधीकधी किती असामान्य बनते याची अनेक उदाहरणे देता येतील.

निवडणुकीचा माहोल असेल तर मग अशा बॅगांचे महत्त्व अधोरेखित होते. किती बॅगा घेतल्या? किती बॅगा दिल्या? त्या कोणाकडे पोहोचवल्या? कशासाठी पोहोचवल्या? असे अनेक प्रश्न निवडणूक प्रचार काळात उपस्थित होतात पण त्याच्या उत्तराची अपेक्षा मात्र कोणीही करत नाही. कारण त्यांना त्या बॅगेचे महत्त्व कळालेले असते.

हेही वाचा :

भाजपा 255 च्या वर जाणार नाही; अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांचा दावा

इचलकरंजी येथील सांगली रोडचे नागरिक आक्रमक.… अन्यथा मोठे जन आंदोलन छेडणार

एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच धक्का; मोदींच्या व्यासपीठावर ‘जागा’ न दिल्याने बड्या नेत्याचा ‘जय महाराष्ट्र…’