बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे(married). अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भात अनेक चर्चा होत असतात. सध्या सारा अली खानच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. सारा अली खान यावर्षात लग्न करू शकते, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सारा अली खानचा साखरपुडा झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता अभिनेत्रीच्या लग्नाची आणि मिस्ट्री मॅन कोण हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
सारा अली खानचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं आहे(married). सुशांत सिंह राजपूत, कार्तिक आर्यन ते क्रिकेटर शुबमन गिल पर्यंत तिचं नाव जोडलं गेलं आहे. अभिनेत्रीने अद्याप पब्लिकली आपल्या रिलेशबाबत भाष्य केलेलं नाही. अशातच आता रेडिटव एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात सारा अली खान लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
सारा अली खानचा एका श्रीमंत उद्योगपतीसोबत साखरपुडा झाल्याचं समोर आलं आहे. रेडिटवर व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार, सारा अली खान तिच्या आगामी ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटाच्या शूटिंगनंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात करणार आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे,”मी याआधीही सांगितलं आहे. त्यावेळी माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही.
पण साराचा साखरपुडा पार पडला आहे आणि दोन वर्षाच्या आत ती लग्नबंधनात अडकणार आहे. सारा अली खान लवकरच ‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करणार आहे. साराने कोणताही नवा चित्रपट साइन केलेला नाही. त्यामुळे आता ‘मेट्रो इन दिनो’नंतर ती लग्नाच्या तयारीला सुरुवात करणार आहे”.
पोस्टमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, ज्याच्यासोबत सारा अली खानचं लग्न होणार आहे त्याच्यावर साराचं खूप प्रेम आहे. सारा खूप आनंदी आहे. साराच्या घरच्यांनीदेखील त्यांच्या नात्याला मंजूरी दिली आहे. विश्वास ठेवा किंवा ठेऊ नका पण वेळच सर्व काही सिद्ध करेल. सारा नव्या प्रवासासाठी खूप-खूप शुभेच्छा”.
या व्हायरल पोस्टवर सारा अली खान किंवा तिच्या कुटुंबियांनी काहीही माहिती दिलेली नाही. सारा अली खान सध्या ‘मेट्रो इन दिनों’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सारा अली खानने 2018 मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. या चित्रपटात सारा अली खानसोबत सुशांत सिंह राजपूत झळकला होता.
हेही वाचा :
शरद पवारांना धक्का! कोल्हापुरातील या नेत्याची राष्ट्रवादी ला सोडचिठ्ठी
केस ओढले, खाली पाडले; दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये दोन मुलींमध्ये तुफान हाणामारी : VIDEO
सेक्स टेप प्रकरण 100 कोटींची ऑफर रेवन्ना प्रकरणात काँग्रेसच्या मोठ्या