येथील पार्वती औद्योगिक वसाहतीतील श्री पार्श्व एंटरप्रायजेस(factory) नावाच्या प्लेटींग, पावडर कोटींग फॉस्पेटींग करण्याच्या कारखान्याला शॉर्टसर्किटने आग लागली यामध्ये सुमारे १९ लाख ३९ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. सदरची आग शनिवार ता. १८ रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास लागली. याबाबतची वर्दी जयदिप पाटील (रा. शांतीनगर, इचलकरंजी) यांनी शहापूर पोलिसांत दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शांतीनगरमध्ये(factory) राहणारे जयदिप पाटील यांचा पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट नं. १४४ मध्ये श्री पार्श्व एंटरप्रायजेस नावाच्या प्लेटींग पावडर कोटींग फॉस्पेटींग करण्याचा कारखाना आहे.
या कारखान्यात शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत रेक्टीफायर मशिन, प्लेटींग बॅरेल मशिन, झिंग मेटल १६ नग, डायर मशिन, कच्चे पक्के केमिकलचा स्टॉक, कोटींग पावडरचा स्टॉक, सीसीटीव्ही कॉमेरे, इलेक्ट्रीक वायरिंग, ब्लोअर मशिन, लोखंडी कपाटे, इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आगीत सुमारे १९ लाख ३९ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाल्याचे जयदिप पाटील यांनी आपल्या वर्दीत म्हटले आहे.
हेही वाचा :
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो
सांगली, पुण्यासह ५ रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी
मला खूप आनंद झाला…; प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर : ऋतुराज गायकवाड