रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची प्रेक्षक(viral) उत्सुकतेने वाट बघत आहेत. ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगण हा पुन्हा एकदा बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. अशातच या चित्रपटाचं सध्या श्रीनगरमध्ये शूटिंग सुरु आहे. नुकताच सोशल मीडियावर श्रीनगरमध्ये सुरु असलेल्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये(viral) अजय देवगण आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यामधील फायटिंग सीनचं शूटिंग सुरु आहे, असं दिसत आहे. यामध्ये अजय हा पोलिसांच्या वर्दीत दिसत आहे तर जॅकी श्रॉफ हे ग्रीन जॅकेट आणि ब्लॅक पँट अशा लूकमध्ये दिसत आहेत. अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या व्हायरल झालेल्या फायटिंग सीनच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
‘सिंघम अगेन’ हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा पाचवा पार्ट आहे, याआधी त्याचे सिंघम, सिम्बा,सूर्यवंशी आणि सिंघम रिटर्न्स हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता रोहित हा ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातून मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
रणवीर सिंह, अक्षय कुमार, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर हे कलाकार ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात काम करणार आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुनचा सिंघम अगेन चित्रपटातील लूक रिव्हिल करण्यात आला होता.
हेही वाचा :
आम्हाला अटक करा..’ CM केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा
सांगलीमध्ये शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू…
प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची कोयत्याने हत्या; शीर हातात घेऊन सेल्फी