महाराष्ट्रात सोन्यासह चांदीचे दर गडगडले….

बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार सध्या चांदीच्या दागिन्यांची डिमांड वाढली आहे. सोन्याचे(gold jewelry) दागिने परिधान करण्यापेक्षा अनेक महिला ऑक्सिडाइज टाइप चांदीच्या दागिन्यांना जास्त पसंती देतात. तर सोन्याकडे दागिन्यांऐवजी गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहतात. अशात काल सोन्याचा भाव वाढला होता. मात्र आज पुन्हा एकदा सोन्यासह चांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊ आजच्या नव्या किंमती.

आज सोन्याच्या(gold jewelry) किंमतींमध्ये १०० ग्राम मागे १०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ६,८५,४०० रुपये आहे. २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ७,४७,६०० रुपये आहे. तर १८ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ५,६०,८०० रुपये इतकी आहे.

प्रति तोळा भाव
प्रति तोळा २२ कॅरेट सोनं आज ६८,५४० रुपये आहे, २४ कॅरेट सोनं ७४,७६० रुपये प्रति तोळा आणि १८ कॅरेट सोनं ५६,०८० रुपये प्रति तोळ्याने विकलं जातंय. भाव कमी झाल्यानो गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी आहे.

मुंबई आणि पुण्यातल्या किंमती
मुंबईत १ ग्राम २२ कॅरेट सोनं ६,८९० रुपये, २४ कॅरेट सोनं ७,५१६ रुपये, १८ कॅरेट सोनं ५,६३७ रुपये प्रति १ ग्राम आहे. पुण्यातील १ ग्राम २२ कॅरेट सोन्याचे दर ६,८९० रुपये, २४ कॅरेट सोनं ७,५१६ रुपये आणि १८ कॅरेट सोनं ५,६३७ रुपये प्रति १ ग्राम आहे.

अन्य शहरांतील २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा आजचा भाव

-चेन्नईत आज २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,८४९ रुपये

-नवी दिल्लीत २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,८५४ रुपये

-कोलकत्तात २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,८९० रुपये

-अहमदाबादमध्ये २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,८४४ रुपये

चांदीच्या किंमती
सकाळी जाहीर झालेल्या दरांनुसार आज चांदीच्या भावातही घसरण झाली. आज प्रति किलो चांदीची किंमत ९३,००० रुपये आहे.

हेही वाचा :

मनातील भीती काढण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या

अकायच्या जन्मानंतर बदलला अनुष्का शर्माचा लूक; घायाळ करणारे सौंदर्य

डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!