चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यानंतर(viral) सीएसकेचा यंदाच्या आयपीएलमधील प्रवास थांबला अन् आरसीबीने विजयानंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. धोनीच्या (कथिथ) अखेरच्या आयपीएलमध्ये हंगामात चेन्नईला विजय न मिळवता आल्याने अनेक खेळाडूंचं स्वप्न भंगलं आहे. आयपीएल हंगाम संपल्यानंतर धोनी अँड कंपनीने गाशा गुंडाळला. सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी धोनीने रांची गाठली.
सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी धोनी आपल्या कुटुंबासह(viral) रांचीला परतला. अशातच आता सोमवारी लगेच धोनी आपल्या कामात व्यस्थ झाल्याचं पहायला मिळतंय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये धोनी रांचीच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसतोय. धोनीच्या घराबाहेरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आरसीबीविरुद्ध धोनीने 13 बॉलमध्ये 25 धावा चोपल्या आहेत. संघाला विजयाच्या उंबरठ्यावर धोनीने आणून ठेवलं होतं. मात्र, यश दयालच्या बॉलने धोनीचा पत्ता कट केला अन् धोनीला चेन्नईला विजयी करता आलं नाही. धोनीने यंदाच्या हंगामात प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. धोनीने 11 डावात 53.67 च्या सरासरीने 161 धावा केल्या. ज्यामध्ये नाबाद 37 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.
चेन्नईचा पराभव धोनीच्या फार जिव्हारी लागला असून सामन्यानंतर चेन्नईच्या कॅम्पमधून घऱी परतणारा तो पहिला खेळाडू होता. धोनी रविवारीच आपल्या रांचीमधील घरी दाखल झाला. या सर्व घडामोडींदरम्यान धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. इम्पॅक्ट प्लेयर नियम कायम राहिल्यास धोनी संघासाठी विशिष्ट जबाबदारी पार पाडण्याच्या हेतूने पुढे खेळू शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पुढील वर्षी आयपीएलचा मोठा लिलाव होणार आहे आणि प्रत्येक संघांला जास्तीत जास्त तीन खेळाडू ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. त्यामुळे धोनीला चेन्नई रिटेन करणार का? जरी केलं तरी धोनी पूर्ण सामना खेळणार का? असा सवाल विचारला जात आहे.
हेही वाचा :
इचलकरंजी तारदाळ मध्ये रेशन दुकानातील धान्यात अळ्या; ग्राहकातून संताप
बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष
गर्भवती महिला आणि बाळांना मिळणार ६ हजार रुपये; काय आहे ही योजना?