महंगाई डायन… ऑक्टोबरपर्यंत डाळींचे भाव कमी होणार नाहीत

मुंबई : देशातील खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या महागाईमुळे(pulse) सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. डाळींचे भाव देखील कमी होताना दिसत नाही. या डाळींचे भाव पुढील काही कमी होणार होणार नाहीत, असे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे डाळींचा पुरवठा कमी झाला आहे.

ईटी रिपोर्टनुसार, तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बाजारात नवीन मालाची आवक येत नाही, तोपर्यंत बाजारात डाळींचे(pulse) दर कमी होत नाही. बाजारात नवीन मालाची आवक ऑक्टोबर महिन्यात सुरु होईल. त्यामुळे सर्वसामान्यांना ऑक्टोबरपर्यंत दिलासा मिळणार नाही.

बाजारात डाळींची मागणी आहे. मात्र, त्यानुसार मालाचा पुरवठा होत नाहीये. मागणी आणि पुरवठ्याच्या गणितात बिघाड झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. डाळींचे दर वाढल्याने इतर पदार्थांच्या दरावरही परिणाम पाहायला मिळत आहे.

सरकारकडून डाळींच्या किमतींवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारत डाळींचा मोठा उत्पादक आहे. तरीही भारताला डाळी आयात करावा लागल्यात.

बाजारात तूर डाळ, चना डाळ, उडद डाळींच्या दरात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात महागाईचा दर १६.८ टक्के होता. सर्वात अधिक ३१.४ टक्के तूर डाळ महाग होती. चना डाळीमध्ये १४.७ टक्के होती. तर उडद डाळीत १४.३ टक्के महागाई होती.

हेही वाचा :

12वी नंतर पुढे काय करायचं? वाचा करिअरच्या संधी

सांगली हादरलं! प्रवासी बॅगेत पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

सचिन तेंडुलकरचा मुलगा देवदर्शनासाठी कोल्हापुरात; नृसिंहवाडीतील श्री दत्त महाराजांचं घेतलं दर्शन