उजनीच्या पाण्यावरून राजकारण पेटले, विद्यमान आमदारांवर चिखलफेक

उजनी धरणाच्या पाणीपातळीत दररोज कमालीची घट होत आहे. उजनी धरणातील(political articles) पाणीसाठा सध्या मायनस 57 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या 41 विविध योजनांपैकी सर्वच योजना बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सोलापूर, पुणे, धाराशिव आणि नगर या चार जिल्ह्यांची भविष्यातील ‘धक-धक’ वाढली आहे. पण, आमदारांचे लाड पुरविण्यासाठी उजनीतून पाणी सोडण्यात येते, असं म्हणत करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

उजनी धरणाकडे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी(political articles) म्हणून पाहिलं जातं. 110 टक्के भरूनही उन्हाळ्यात पाण्यासाठी जिल्ह्यात नागरिकांना वणवण फिरावं लागतं. नियोजनाचा अभाव आणि राजकीय नेत्यांनी पाण्याची पळवापळवी केल्यानं दरवर्षी उजनी उन्हाळ्यात मायनसमध्ये जाते, असा आरोप सातत्यानं केला जातो. गेल्यावर्षी सोलापूर, पुणे जिल्हासह उजनी क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे उजनी धरण 66 टक्के भरलं होतं. सध्या जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून उन्हाची तीव्रताही वाढली आहे. उजनीवर अवलंबून असलेल्या अनेक योजना आणि उद्योगांना पाणी बंद करण्यात आल्या आहेत.

यातच नारायण आबा पाटील यांनी संजयमामा शिंदेंना लक्ष्य केलं आहे. “उजनीच्या पाण्याकडे पाहणारा कुणीच नेता नाही. वास्तविक विद्यमान आमदार (संजयमामा शिंदे) यांनी उजनीकडेला असलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे दोनवेळा गरज नसताना उजनीतून पाणी सोडण्यात आलं. काही आमदारांचे लाड पुरविण्यासाठी उजनीतून पाणी सोडण्यात येते. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली, तर उजनीत पाणी राहणार नाही. त्यामुळे शासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन उजनीनं सकारात्मक दृष्टीनं पाहण्याची गरज आहे.”

“उजनीतील वाळूमिश्रीत गाळ काढण्यात आला पाहिजे. एक ते दोन वर्षात हा गाळ निघेल, असं वाटत नाही. त्यामुळे दोन ते तीन वर्षा या गोष्टी लागले, तरी चालतील. सोळा ते सतरा ‘टीएमसी’ वाळूमिश्रीत गाळ आहे. तो काढणं गरजेचं आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढेल आणि भविष्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल,” अशी मागणी नारायण आबा पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

हेही वाचा :

सावधान..! सावधान..! दिल्ली पोलिसांचा धोनीबाबत डोळ्यात अंजन घालणारा प्रश्न

12वी नंतर पुढे काय करायचं? वाचा करिअरच्या संधी

आईसोबत फिरते जग, आराध्या बच्चन कधी जाते शाळेत?