आज बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल(Minister) कधी जाहीर होणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात आहे. याचेच उत्तर आता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे(Minister) दीपक केसरकर यांनी अभिनंदन केलं आहे. दीपक केसरकर म्हणाले आहेत की, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत, ती मुलं पुन्हा बसू शकतात. परीक्षा लवकर घेण्याची सूचना केल्या आहेत.
दीपक केसरकर म्हणाले, ”कोणीही नाराज होऊ नयेत. संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.” ते म्हणाले, दहावीचा निकाल 27 मे ला निकाल लागू शकतो.
कथित आरटीई घोटाळ्यावर बोलताना केसरकर म्हणाले की, याला घोटाळा म्हणता येणार नाही. कोणीही खोटी कागदपत्रे तयार करू नये. अॅडमिशन ही जिल्हा स्तरीय होते. जिल्हास्तरावर गुन्हा नोंदवला आहे. गैरप्रकार कसे रोखता येतील याबाबत प्रक्रिया सुरू आहे.
ते म्हणाले, टटज्यांना बारावीमध्ये कमी मार्क्स मिळाले आहेत, ते देखील पुन्हा परीक्षेला बसू शकतात. साधारण जुलैमध्ये ही परीक्षा होईल, ऑगस्टमध्ये निकाल लागतील.
दरम्यान, आज बारावीचा निकाल जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीची एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी या परीक्षेत एकूण 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
हेही वाचा :
उजनीच्या पाण्यावरून राजकारण पेटले, विद्यमान आमदारांवर चिखलफेक
उद्धव ठाकरे लंडनला पळून जाणार; नितेश राणेंचा खळबळजनक दावा
सावधान..! सावधान..! दिल्ली पोलिसांचा धोनीबाबत डोळ्यात अंजन घालणारा प्रश्न