बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बाजारातील(stocks) शेवटच्या तासात चांगली रिकव्हरी झाली. त्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद झाले. बुधवारी सर्वात जास्त वाढ एफएमसीजी, रियल्टी, फार्मा शेअर्समध्ये दिसून आली तर मेटल शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग दिसून आले.
बाजार बंदच्या शेवटच्या तासात बाजारात(stocks) चांगली रिकव्हरी झाली. सेन्सेक्स 267 अंकांनी वाढून 74,221 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 69 अंकांनी वाढून 22,598 वर बंद झाला. निफ्टी बँक 266 अंकांनी घसरून 47,7782 वर बंद झाला. तर मिडकॅप इंडेक्स 99 अंकांनी वाढून 52,167 वर बंद झाला.
हेवीवेट काउंटरमध्ये उशीरा वाढ झाल्याने निफ्टीला 68.75 अंकांच्या वाढीसह 22,597.80 वर बंद होण्यास मदत झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. डेली चार्टवर बॅक-टू-बॅक ग्रीन कँडल्स मजबूत तेजीचा कल दर्शवत आहेत आणि आता निफ्टीचा रझिस्टंस त्याच्या आधीच्या हाय म्हणजे 22,780 वर आहे. तर 22,470 च्या दिशेने सपोर्ट सरकला आहे.
बाजारातील सर्व महत्त्वाचे सेक्टरल इंडेक्स रिकव्हरीला हातभार लावत असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. पण बँकिंग सेक्टरची खराब कामगिरी ही तेजी मर्यादित ठेवत आहे. बाजारातील गोंधळात निफ्टी इंडेक्स लवकरच विक्रमी उच्चांक गाठेल असा अंदाज आहे.
निफ्टीमध्ये तेजीचा कल कायम आहे आणि त्याला 22500 च्या पातळीवर सपोर्ट मिळत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. रायझिंग चॅनलमध्ये इंडेक्स वरच्या दिशेने जात आहे. जोपर्यंत निफ्टी 22500 च्या वर राहील तोपर्यंत वरचा ट्रेंड चालू राहील.
तर शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 22600 वर सपोर्टसह 22800 च्या दिशेने जाताना दिसू शकतो. पण, 22600 च्या खालील घसरण निफ्टीला शॉर्ट टर्ममध्ये 22500 पर्यंत नेऊ शकते.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
- सिप्ला (CIPLA)
- टाटा कंझ्युमर (TATACONSUM)
- हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
- कोल इंडिया (COALINDIA)
- रिलायन्स (RELIANCE)
- पेज इंडिया (PAGEIND)
- पीआय इंडस्ट्रीज लिमिटेड (PIIND)
- कोफोर्ज (COFORGE)
- लुपिन लिमिटेड (LUPIN)
- ऍस्ट्रल (ASTRAL)
नोंद – म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
हेही वाचा :
पुणेकरांचा उद्रेक! मस्तवाल बिल्डरवर शाई फेकली
देश राहुल गांधींकडे गांभीर्याने पाहतो, फक्त मोदीच त्यांची टिंगल करतात!
मोदी सरकारपुन्हा हात पसरलेरिझर्व्हबँकेकडून 2.11लाख कोटीसरकारच्तिजोरीत
थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी पालिका नागरी सुविधा केंद्रे खुली ठेवणार