आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि पोस्ट यामुळे चर्चेत असलेली मराठी अभिनेत्री(construction) केतकी चितळे हिने पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या हिट अँड रन घटनेवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या दुर्दैवी अपघाताच्या प्रकरणावर आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत केतकीने प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसिद्ध बांधकाम(construction) व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवून एका दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोन्ही अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अल्पवयीन मुलगा दारू पिऊन गाडी चालवित होता. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह अजून एका चारचाकी गाडीला त्याची पोर्श कार धडकली आणि त्यामध्ये दोन जणांचा बळी गेला. या अपघातानंतर रस्त्यावरील जमावाने या अल्पवयीन मुलाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाच्या या मुलाला या प्रकरणातून वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे हे मध्यरात्री पोलिस स्टेशनमध्ये गेले. तेथे त्यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी उशीरा या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी केली, यामुळे त्याने दारू प्यायली होती की नाही, याचा अहवाल निगेटिव्ह आला. परिणामी अवघ्या काही तासातच या मुलाला कोर्टाकडून जामीन मिळाला. या संपूर्ण घटनेनंतर पोलिस प्रशासनासह राज्य सरकार तसेच न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात होते.
दोन निष्पाप तरूण-तरूणींचा बळी घेतलेल्या या आरोपीला 15 तासात जामीन मिळाल्याने हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणावर मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने एक व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये केतकीने पोलिसांवर कडक शब्दात टीका केली आहे. या अपघात प्रकरणात ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि त्या अल्पवयीन मुलाची काही चूक नव्हती, असा पोलिसांनी प्लॅन करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांचा हा प्लॅन फसला. ‘पोलीस महानालायक असतात हे आपल्याला माहित आहे’, अशा शब्दात केतकीने पोलिस यंत्रणेवर टीकास्त्र सोडले आहे.
याबरोबरच आणखी एक व्हिडिओ देखील तिने शेअर केला असून त्यामध्ये ती म्हणते, या अल्पवयीन मुलाने 48 ते 50 हजारांचे हॉटेलचे बिल केल्याने त्याने किती दारू प्यायली असेल याचा अंदाज येतो. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे गेलेल्यांनाच पोलिसांनी आरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं, ही गोष्ट नवीन नाही, असेही केतकी म्हणाली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा :
गृहिणींचे बजेट बिघडणार, मेथी, कोंथिबीर महागली, एका जुडीचा दर तब्बल…
यंत्रमाग उद्योगाला अतिरिक्त वीज सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांना महासंघाचे निवेदन
महाराष्ट्रात येऊ घातलेला आणखी एक मोठा उद्योग बाहेर…