‘मला हलक्यात घेऊ नका, सगळ्यांचे टांगे पलटी करेन.!’; जरांगे पाटलांचा इशारा नेमका कुणाला?

मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला(govt) सळो की पळो करुन सोडले होते.मराठा बांधवांसाठी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं म्हणून ते इरेला पेटले आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीत(govt) त्यांनी कोणत्याही पक्षाला साथ न देता मराठा समाजाला तुम्हांला ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा असं आवाहन केलं होतं. तसेच आपल्या कुटुंबाला धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोपही केला होता.त्यांच्या या दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. पण आता पुन्हा एकदा त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला धारेवर धरतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे.ते म्हणाले, तुम्ही मला राज्यातून काढलं तर मी लई शहाणा आहे. इकडले मराठे तिकडल्या राज्यात बोलावून मोर्चे काढेन. जेलातले सगळे मराठे कैदी एकत्र करून मोर्चा काढीन. मात्र,समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,गृहमंत्री फडणवीससाहेब, तुम्ही मला जेलमध्ये टाकाल.पण 6 कोटी मराठ्यांचं काय करणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे

यावेळी त्यांनी राजकारणात मला हलक्यात घेऊ नका. सगळ्यांची टांगे पलटी करेन. आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराच जरांगेंनी यावेळी देऊन टाकला.

जरांगे पाटील म्हणाले, काही लोकांचं म्हणणं होतं,मी जातीवाद करतो आहे.त्यामुळे राज्यात मराठा-ओबीसी वाद निर्माण होत आहे.पण तुम्ही माझं एक तरी स्टेटमेंट दाखवा की, मी ओबीसींना दुखावलं.आपण कधीही गाव-खेड्यातल्या ओबीसी बांधवांना आतापर्यंत दुखावलं नाही. जातीवाद केला कुणी? तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे अशी उलट विचारणाच यावेळी विरोधकांना केली.

त्यांनी यावेळी नाव न घेता मुंडे बंधू भगिनींवर टीकेची झोड उठवली.ते म्हणाले, 13 तारखेच्या मतदानापर्यंत मी चांगला होतो.पण 13 तारीख पार पडली. मतदान झालं.आता पुन्हा यांची गुरगुर सुरू झाल. मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही,हे षडयंत्र होतं असा आरोपही त्यांनी यावेळी केला. .

वेळ जर आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही पण पाडल्याशिवाय राहायचं नाही.ज्या जातीचा नेता मराठा विरोधी भूमिका घेईल त्याला निवडून येऊ द्यायचं नाही असं आवाहनही जरांगे पाटलांनी यावेळी केलं.

धनंजय मुंडे यांना मी प्रामाणिक समजायचो. त्यांनी कधी जातीयवाद केला नाही, मी त्यांच अनुकरण इतरांनीही करावे, असं नेहमी सांगायचो. पण, गेल्या पाच-सहा दिवसापासून त्याचं काही तरी बिघडलयं. दिवगंत गोपीनाथ मुंडेसाहेबांनी कधी जातीयवाद केला नव्हता, पण मराठा समाजाचे एवढे उपकार असताना धनंजय मुंडे समाजाविरोधात पोस्ट टाकायला लावून जातीयवाद करत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीनगरात केला.

हेही वाचा :

पुढच्या IPL सिझनमध्ये खेळणार धोनी? CSK च्या CEO नी केला खुलासा

सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं! लसणाची फोडणी महागली…

 ग्रेट फिनिशरची आयपीएल कारकीर्द फिनिश?