अण्णा हजारे, गो. रा. खैरनार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा (leader)शेवटचा पाचवा टप्पा गेल्या सोमवारी पार पडला. त्याच्या आधी 36 तास प्रचाराची रणधुमाळी थांबली. एकमेकाय विरुद्ध बोलण्याचे, आरोप आणि प्रत्यारोप करण्याचे, खुलासे, गौप्यस्फोटाचे दीड दोन कधी संपले ते कळलेच नाही. आता काय बोलायचे? कुणावर बोलायचे? कशासाठी बोलायचे? हा अनेकांना प्रश्न पडलेला आहे. पण काही असे राजकारणी आहेत की त्यांना विषयांची कमतरता नसते. ज्येष्ठ राजकारणी शरद पवार हे त्यापैकी एक आहेत. त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, गो. रा. खैरनार यांचा विषय आपल्या आठवणींच्या पोतडीतून बाहेर काढला आणि आता त्यावर चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई महापालिकेचे(leader) निवृत्त उपायुक्त गो. रा. खैरनार, तसेच अण्णा हजारे हे दोघे आता कुठे दिसत नाहीत. इसवी सन 2014 नंतर तर अण्णा हजारे दिसलेच नाहीत असा उपरोधिक उल्लेख शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना नुकताच केला. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही त्यावर तिखट प्रतिक्रिया देताना मी काही राजकारणी नाही. शरद पवार यांच्या विषयी आता काय बोलावे? त्यांच्यावर बोलण्यासारखे आता राहिले काय? असे उपरोधिक स्वरात त्यांनी म्हटले आहे.

अण्णा हजारे यांनी राज्यभर आणि देशभर भ्रष्टाचार विरोधी लढा सुरू केला तेव्हा आमदार रोहित पवार हे राजकारणात नव्हते. पण अण्णा हजारे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनी स्वयंघोषित गांधी असा उल्लेख अण्णा हजारे यांचा केलेला आहे. रोहित पवार यांनी हजारे यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांना अण्णा हजारे यांचे ज्येष्ठत्व पहा आणि मग टीका टिपणी करा असा सल्ला दिला आहे.

चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी देशाच्या सद्यस्थितीला अण्णा हजारे जबाबदार असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीत जंतर मंतर रोडवर उपोषण आंदोलन केले नसते तर भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आले नसते असे त्यांना अप्रत्यक्षरीत्या सुचवायचे होते.

शरद पवार यांनीही 2014 नंतर हजारे कुठे दिसत नाहीत असे म्हटले आहे. त्यामागेही केंद्रात भाजपचे सरकार येण्यामध्ये अण्णा हजारे यांचे आंदोलन कारणीभूत ठरले असे त्यांना म्हणावयाचे आहे. शरद पवार हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी भ्रष्टाचाराचे थेट आरोप करायला सुरुवात केली होती. महापालिकेचा एक अधिकारी थेट मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांनी तेव्हा स्वतःकडे वेधून घेतले होते.

पत्रकारांनी खैरनार यांना विचारले होते की तुमच्याकडे शरद पवार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत का?
तेव्हा त्यांनी माझ्याकडे ट्रक भरून पुरावे आहेत असे सांगून खळबळ उडवून दिली होती. खैरनार यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर खैरनार यांच्या बाजूने त्यांच्या समर्थन करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णा हजारे यांना गांधी म्हणून फटकारले होते.

नवी दिल्लीतील जंतर मंतर रोडवर अण्णा हजारे यांनी तत्कालीन काँग्रेस सरकार(leader) विरोधात आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या या आंदोलनाकडे संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष वेधून राहिले होते तसेच परदेशातही त्यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू झाली होती. या आंदोलनानंतर काही महिन्यातच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व एन डी ए चे सरकार केंद्रात आले. त्यानंतर अण्णा हजारे हे कुठेच सार्वजनिक जीवनात फारसे दिसले नाहीत. त्यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी अटक झाल्यानंतर, त्यांच्या विरुद्ध झालेली कारवाई कशी योग्य आहे हे सांगण्यासाठी ते मीडियासमोर दीड महिन्यापूर्वी आले होते.

वास्तविक खैरनार आणि त्यानंतर अण्णा हजारे हे कुठेच सार्वजनिक जीवनात सक्रिय असे नव्हते. हजारे हे राजकारणी नसल्यामुळे राजकारणावर त्यांनी भाष्य केलेले नाही. हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधातली आपली लढाई पुन्हा सुरू करावी असे सर्वसामान्य जनतेला वाटत असले तरी त्यांनी शांत बसण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. या एकूण पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ते दोघे कुठे दिसत नाहीत असे प्रश्नार्थक केलेले वक्तव्य, प्रचार संपल्यानंतरची पोकळी भरून काढण्यासाठी पुरेसे आहे.

हेही वाचा :

पुढच्या IPL सिझनमध्ये खेळणार धोनी? CSK च्या CEO नी केला खुलासा

सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं! लसणाची फोडणी महागली…

 ग्रेट फिनिशरची आयपीएल कारकीर्द फिनिश?