ओव्हरलोड रद्दी भरून जाणारा भरधाव ट्रकची(truck) पंचगंगा नदीकाठावर लहान पुलावरील शिवनाकवाडी मार्गावर वळसा घालताना पलटी झाला. चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरच ट्रक कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना बुधवारी (ता.२२) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेनंतर रेंदाळ – रांगोळी मार्गावर अनेकांना ठोकरत आलेला ट्रकचालक(truck) काही काळ केबिनमध्ये भीतीने लपून बसला.घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी, हुपरी मार्गावरून ओव्हरलोड रद्दीने भरलेला ट्रक ( टी.एन.५६ एफ ६०८९) इचलकरंजीकडे येत होता. दरम्यान या ट्रकचालकाने येताना रेंदाळ-रांगोळी मार्गावर काही दुचाकी वाहनांना ठोकरले. त्यानंतर भरधाव ट्रकला काही तरुणांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रक सुसाट पुढे निघाला.
त्यानंतर तरुणानी दुचाकीवरून या ट्रकचा पाठलाग सुरू केला. दरम्यान येथील पंचगंगा नदी घाटावरील लहान पुल मार्गाला वळसा घालून शिवनाकवाडीकडे जाताना ट्रक चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर हा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला. रात्रीच्या वेळेस पाऊस पडल्यामुळे मार्गावर वाहनांची वर्दळ कमी होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा :
इचलकरंजीतील तरुण सेल्फी काढताना गेला वाहून….
अण्णा हजारे, गो. रा. खैरनार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार
‘मला हलक्यात घेऊ नका, सगळ्यांचे टांगे पलटी करेन.!’; जरांगे पाटलांचा इशारा नेमका कुणाला?