काँग्रेसने एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण संपवलं…

काँग्रेसने देशातील सुमारे 9,000 संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय (reservation) साठीचे आरक्षण संपवले, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मंदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. इंडिया टीव्हीचा दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले आहेत.

याच मुद्द्यावर बलताना ते म्हणाले आहेत की, ”काल मला कोणीतरी पाठवले की, काँग्रेसने देशातील सुमारे 9,000 संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय यांना अल्पसंख्याक म्हणून नाव देऊन आरक्षण संपवले. पण जर आम्ही एका पीएसयूचे खाजगीकरण केले तर काँग्रेसचे नेते संसदेत प्रश्न उपस्थित करतात आणि आरोप करतात की, आम्ही एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण संपवण्यासाठी खाजगीकरण करत आहोत. पण तुम्ही (काँग्रेस ) त्यांचे आरक्षण(reservation) संपवले आहे.”

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिमाचल प्रदेशातील शिमला येथे निवडणूक सभा पार पडली. या सभेत बोलताना वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावर मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ”काँग्रेसने 4 दशकांपासून लष्करी कुटुंबांना वन रँक वन पेन्शन मिळू दिली नाही. मी 2013 मध्ये माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन लागू करण्याची गॅरंटी दिली होती आणि सत्तेत आल्यानंतर ती लागूही केली.”

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे लोक भारताला नष्ट करण्यासाठी विविध खेळ खेळत आहेत. त्यांना आपल्या राज्यघटनेने एससी, एसटी आणि ओबीसींना दिलेले आरक्षण त्यांच्या व्होट बँकांना द्यायचे आहे. ते फक्त बोलत नाहीत, तर कर्नाटकात काँग्रेसने मुस्लिमांना ओबीसी आरक्षण दिले. त्यांना या मॉडेलवर आणखी काम करायचे आहे.”

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी मुस्लिमांना ओबीसी बनवून आरक्षण दिले आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. पण ममता बॅनर्जी या आदेशाचे पालन करणार नसल्याचे सांगत आहेत. मात्र आम्ही या देशाचे आणखी तुकडे होऊ देणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचा :

“केजरीवालांच्या निवासस्थानी घडलं ‘द्रौपदीचं वस्त्रहरण’”; भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

‘फेक बेबी बंप’ म्हणून झालेल्या ट्रोलिंगनंतर दीपिका आली समोर; Video

अजय देवगणचा सिंघम अगेनमधील फर्स्ट लूक आउट