यंदा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त चर्चेचा राहिला तो म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभा (parliament) मतदारसंघात शिवसेनेनं ( ठाकरे गट ) परस्पर उमेदवार जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस आणि नेते आक्रमक झाले. शेवटच्या क्षणी काहींनी आघाडी धर्म पाळत ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. तरी ठाकरे गटाचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यावर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आपली नाराजी दर्शवली. शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा सोडल्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा केला. मात्र, सांगलीत काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरल्याने ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली होती.
4 जूनला निकाल हाती येणार आहे. मात्र, सांगलीत काँग्रेस आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने आले आहेत. लोकसभा (parliament)निवडणुकीनंतर आणि आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात विशाल पाटील यांची एन्ट्री झाल्यानं ठाकरे गट चांगलाच संतापला आहे. एकीकडे आघाडी धर्म न पाळल्यामुळे विशाल पाटील यांच्यावर कारवाईची मागणी होत असताना काँग्रेस नेते चिडीचूप असल्यानं आधीच ठाकरे गट संतापला होता. यातच स्नेहभोजनाला विशाल पाटील यांनी उपस्थिती लावल्यानं पुन्हा एकदा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार ठाकरे गटाबाबत घडला आहे.
यावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी काँग्रेस हल्लाबोल केला आहे. “काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. याचा अर्थ गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्व काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या बाजूने आहेत का? अशी शंका निर्माण झाली आहे. काँग्रेसची नेमकी भूमिका काय होती त्याचे उत्तर त्यांनी द्यावे,” अशी मागणी ही संजय विभुते यांनी केली आहे.
दरम्यान, या सर्व गोष्टीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी खुलासा केला आहे. “आगामी विधानसभा (parliament)निवडणुकीत कार्यकर्ते जोमाने कामाला लागावेत, यासाठी स्नेह मेळावा आयोजित केला आहे. याचा अर्थ कोणीही कसा घेऊ नये. ठाकरेंच्या सभेला आम्ही उपस्थिती लावली आहे,” असं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं आहे.
हेही वाचा :
सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर बनली मेडिसिनमध्ये मास्टर
फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; धाराशिव जिल्ह्यातील गंभीर प्रकार
दिवस-रात्र मेहनत करूनही वजन होत नाहीये कमी? हे एकदा नक्की करून पहा