भारतीय क्रिकेट संघातील युवा खेळाडू आणि फार कमी वेळात प्रकाशझोतात आलेल्या हार्दिक पांड्यानं(divorce) गेल्या काही दिवसांमध्ये आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केल्याचं पाहायला मिळालं. IPl 2024 मध्ये हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली मैदाना आलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला अपेक्षित यश मिळालं नाही आणि इथंच क्रिकेटप्रेमींनी या खेळाडूवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. एकिकडे करिअरमध्ये या आव्हानांचा सामना करत असतानाच आता चर्चा अशीही आहे की, हार्दिकच्या खासगी जीवनातही काही समीकरणं बिनसली आहेत.
काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आणि सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या चर्चांनुसार हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी, नताशा स्टॅनकोविक त्यांच्या वैवाहिक(divorce) नात्याला पूर्णविराम देत आहेत. हार्दिक आणि नताशाच्या नात्यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, किंवा या दोघांपैकी कोणीही यावर कोणतीही प्रतिक्रियासुद्धा दिलेली नाही. ज्यामुळं आता या चर्चांना आणखी वाव मिळताना दिसत आहे.
इतकंच नव्हे, तर पोटगीच्या स्वरुपात नताशाला हार्दिकच्या एकूण संपत्तीपैकी 70 टक्के भाग मिळणार असल्याची माहितीसुद्धा काही सूत्रांमार्फत मिळाल्यामुळं या चर्चांचं वारं चौफेर उधळ्याचं पाहायला मिळत आहे.
इथं हार्दिक आणि नताशाच्या नात्यामध्ये गोष्टी बिनसल्याच्याच चर्चांनी जोर धरलेला असताना अनेकांनीच सोशल मीडियावर नताशाच्या अकाऊंटचा आढावलाही घेतल्याचं पाहायला मिळालं. जिथं तिनं शेअर केलेले इन्स्टा स्टेटस पाहून नेटकरी थक्कच झाले. कुठं नताशा फेस थेरपी घेताना दिसली, तर कुठं मुलासोबतच बाहेर जाताना, एका स्टोरीमध्ये तिनं स्वत:च्या फिटनेसवरही भर दिल्याचं पाहायला मिळालं. थोडक्यात इथं नताशाच्या स्टोरी आणि तिथं तिच्या आणि हार्दिकच्या नात्यात आलेल्या दुराव्यासंबंधीच्या चर्चा पाहता नेटकरीही गोंधळून गेले आहेत. ज्यामुळं नवनवीन चर्चा सातत्यानं डोकं वर काढत आहेत.
हेही वाचा :
सांगली : हळदीला सोन्याचे दिवस आल्याने यंदा हळदीच्या बियाणे दरात दुप्पटीहून वाढ
सांगलीत कृष्णाकाठी आली चिखल पळवणारी टोळी, टोळीचा लक्षवेधी गोंगाट