हार्दिक पंड्या टीम इंडियासोबत अमेरिकेला जाणार नाही; समोर आलं मोठं कारण

आयपीएल २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना २६ मे रोजी होणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर(team india) १ जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू २ गटात वेस्टइंडीजला रवाना होणार आहेत. दरम्यान पहिला गट २५ मे रोजी अमेरिकेला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.तत्पूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. हार्दिक पंड्या पहिल्या आणि दुसऱ्या गटासोबत वेस्टइंडिजला जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

माध्यमातील वृत्तानुसार,हार्दिक पंड्या भारतात नाहीये. तो इंग्लंडमध्ये आपल्या कुटुंबासोबत(team india) सुट्ट्यांचा आनंद घेतोय. भारतीय संघ आपले सुरुवातीचे सामने अमेरिकेत होणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, भारतीय संघाचा पहिला गट २५ मे रोजी रात्री १० वाजता अमेरिकेला जाण्यासाठी रवाना होणार आहे.

या गटात विराट कोहली,रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रिषभ पंतसारख्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. तर यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहल हे खेळाडू दुसऱ्या गटासोबत अमेरिकेला रवाना होणार आहे.

नुकताच हार्दिक पंड्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो शेअर केला आहे. ज्यात तो स्विमिंग पुलमध्ये असल्याचं दिसून येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार हार्दिक पंड्या लंडनहून थेट अमेरिकेला जाऊ शकतो. त्यामुळे तो दोन्ही गटांसह अमेरिकेला जाणार नाही.

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु असल्याने भारतीय संघाने २ गटात अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज खेळाडू आयपीएल स्पर्धेत टीकून आहेत, ते खेळाडू दुसऱ्या गटासोबत वेस्टइंडिजला रवाना होणार आहेत. तर स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघातील खेळाडू पहिल्या गटासोबत अमेरिकेला रवाना होणार आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

हेही वाचा :

मोठी बातमी: ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपला…

‘पैशांसाठी मी घाणेरड्या…’; नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

सांगली : काँग्रेसच्या ‘मटण-भाकरी’ने खवळली शिवसेना, घात केल्याचा आरोप