ठाकरे गटाच्या नेत्याकडून बाजार समितीच्या सभापतीला मारहाण

हिंगोली : हिंगोलीत सेनगाव कृषि उत्पन्न बाजार(market) समितीच्या सभापतीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी ही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या सेनगाव कृषि उत्पन्न बाजार(market) समितीचे सभापती आणि भाजप नेते अशोक ठेंगल यांना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी ही मारहाण केली आहे. या व्हिडिओमध्ये ठाकरे गटाचे संदेश देशमुख यांच्यासह दहा ते बारा जणांनी मारहाण केल्याचे दिसून येत आहे. आर्थिक व्यवहारातून मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.

मारहाणीच्या घटनेनंतर बाजार समितचे सभापती अशोक ठेंगल यांनी तक्रारी दिली. त्यानंतर ठेंगल यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

तसेच भाजप नेते अशोक ठेंगल यांच्याविरोधात देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बाजार समितीचे संचालक वैभव देशमुख यांच्या तक्रारीवरून सभापती अशोक ठेंगल यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. अशोक ठेंगल यांच्या विरोधात अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते, कधी या बाजार समितीमध्ये शेतकरी दरवाढीवरून गोंधळ घालतात. तर कधी बाजार समिती प्रशासन व्यापाऱ्यांची अडवणूक करते. आता तर शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या बाजार समिती सभापती व संचालकामध्येच आर्थिक देवाण-घेवाणीवरून प्रचंड राडा व मारहाणीची घटना घडली. यामुळे सेनगावच्या शेतकऱ्यांचा वाली कोण, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

हेही वाचा :

‘भविष्यात आपल्या कोणाकडेही जॉब नसेल’; इलॉन मस्क नेमकं काय म्हणाले?

मुंबई पोलिसांना ‘हीरामंडी’ सीरिजची भूरळ, पोस्ट पाहून अमृता म्हणाली…  

हार्दिक पंड्या टीम इंडियासोबत अमेरिकेला जाणार नाही; समोर आलं मोठं कारण