माधुरी दिक्षित आणि सुनील शेट्टीच्या ‘डान्स दिवाने ४’चा नुकताच दिमाखदार महाअंतिम सोहळा(history) पार पडला. पण यामध्ये, एक ट्वीस्ट आहे. यंदाच्या सीझनला एक नाही तर दोन फायनलिस्ट मिळालेले आहे. दिल्लीचा २२ वर्षीय गौरव शर्मा आणि बंगळुरूच्या १९ वर्षीय नितिन एनजेने या रिॲलिटी शोचा किताब मिळवलेला आहे. दोघांनाही बक्षीस म्हणून २० लाख रुपये मिळालेले आहेत.
‘डान्स दीवाने’ या कार्यक्रमाने साडे तीन महिने प्रेक्षकांचं(history)मनोरंजन केलं. नितिनने आणि गौरवने ‘डान्स दीवाने’साठी वेगवेगळ्या ऑडिशन दिल्या होत्या. पण पुढे फायनलसाठी यांनी एकत्र परफॉर्म केला. एकत्र विजेते होऊनच कार्यक्रमातून बाहेर पडले आहेत. दोघांनाही बक्षीस म्हणून २० लाख रुपये मिळालेले आहेत. पण हे दोघेही या बक्षीसाचं काय करणार आहेत ? याबद्दल सांगितले आहे.
मुलाखतीत नितिनने आणि गौरवने सांगितले की, आम्हाला दोघांनाही २० लाख रुपये बक्षीस मिळाले आहेत. पण आम्ही ही रक्कम अर्धी वाटून घेतली आहे. जिंकलेली रक्कम नितीन आई- वडीलांना देणार आहे. आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन मी शॉपिंग करणार आहे. तर गौरवने सांगितले जिंकलेली अर्धी रक्कम आई- वडीलांना देणार आहे. तर उरलेल्या रक्कममध्ये मी माझ्या मैत्रीणीसोबत फिरायला जाणार आहे.
गौरव आणि नितीन, युवराज आणि युवांश, चिराश्री आणि चैनवीर, श्रीरंग आणि वर्षा, दिव्यांश आणि हर्ष, काशवी आणि तरनोज या जोड्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली होती. पण शेवटी गौरव आणि नितिन यांनी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
हेही वाचा :
भाजप पक्षामध्ये जावं असं काही सहकाऱ्यांचं म्हणणं….; शरद पवारांचा सर्वात मोठा खुलासा
अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी 25 ते 30 कोटी वाटले : संजय राऊत
क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! विराट अचानक निवृत्ती जाहीर करु शकतो…