गुजरातमधील राजकोट शहरात शनिवारी एका गेमिंग झोनमध्ये(government) झालेल्या भीषण आगीत नऊ लहान मुलांसह 32 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तासांत दिल्लीतील विवेक विहार परिसरात एक बेबी केअर सेंटर आगीच्या विळख्यात सापडले. यामध्ये सात बालकांना आपला जीव गमवावा लागला. केवळ सात तासात 16 निष्पाप मुलांचा बळी गेला. दोन्ही घटनांमध्ये सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे.
राजकोट अग्निकांड घडले त्यावेळी गेमिंग झोनमध्ये मोठ्या(government) प्रमाणात लोक होते. त्यामध्ये लहान मुलांची संख्याही मोटी होती. शनिवारी याठिकाणी 9 रुपयांत तिकीटाची ऑफर सुरू होती. त्यामुळे गर्दी झाली होती. त्यातच जाण्या-येण्याचा मार्गही एकच होता. त्यामुळे अचानक लागलेल्या आगीमुळे लोकांना लगेच बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे 32 जणांना आपला जीव गमवावा लागला.
गेमिंग झोन चालकाने अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणासाठी ना हरकत प्रमाणपत्रही घेतले नव्हते. गेमिंग झोनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचा साठा, प्लायवूड होते. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली.
पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक केले आहे. तर दुसरीकडे गुजरात हायकोर्टानेही या घटनेची गंभीर दखल घेत ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचे म्हटले आहे. तसेच राजकोट महापालिकेकडून स्पष्टीकरण मागवले आहे. या ठिकाणाची पालिका प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली होती की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दिल्लीतील विवेक विहार येथील एका बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आग लागली. यावेळी सेंटरमध्ये जवळपास बारा लहान मुले होते. त्यापैकी पाच मुलांनाच सुरक्षितपणे बाहेर काढणे शक्य झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून इतर सात मुलांचा मृत्यू झाला आहे.
सेंटरच्या तळमजल्यावर अवैधपणे सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळ सिलेंडरचा स्फोट झाला आणि संपूर्ण सेंटरमध्ये आग पसरली. अनेक दिवसांपासून हे सेंटर बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याकडेही सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याची चर्चा आहे.
हेही वाचा :
एक शो दोन विजेते, ‘Dance Deewane 4’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं
भाजप पक्षामध्ये जावं असं काही सहकाऱ्यांचं म्हणणं….; शरद पवारांचा सर्वात मोठा खुलासा
अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी 25 ते 30 कोटी वाटले : संजय राऊत
क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! विराट अचानक निवृत्ती जाहीर करु शकतो…