ताडोबात पर्यटकांनी वाघाला घेरले! सरकारी यंत्रणा हादरली, वन्यप्रेमी चिंतेत

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापनाने डोळय़ावर पट्टी बांधलीय का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ताडोबाची सफर करणाऱया अतिउत्साही पर्यटकांनी शनिवारी ‘अतिरेक’ केला. जिप्सीमधून फिरताना कोअर झोनमध्ये एका वाघाला घेरून ठेवले. या धक्कादायक प्रकाराने सरकारी (govt)यंत्रणा हादरली आहे, तर वन्यप्रेमींनी ताडोबातील वाघांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

ताडोबामध्ये केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देशविदेशातील लाखो पर्यटक हजेरी लावतात. विशेषतः उन्हाळी सुट्टीत मोठय़ा प्रमाणावर पर्यटक ताडोबाची सफर करतात. हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त वावरणाऱया वाघांना जवळून पाहण्यासाठी पर्यटकांची पावले वळतात. मात्र काही पर्यटकांचा अतिउत्साह सध्या चिंतेचे कारण बनला आहे. शनिवारी असाच एका प्रकार घडला. कोअर झोनमधील मोहर्ली ते खटोडा रस्त्यावर वाघ ऐटीत चालला होता. त्याला पॅमेऱयात पैद करण्याचा, नजरेत साठवण्याचा योग आला होता, परंतु पर्यटकांनी उत्साहाचा अतिरेक दाखवला. एकेक करीत अनेक जिप्सी वाघाच्या भोवताली उभ्या राहिल्या. चहुबाजूंनी वाघाचा रस्ता ‘ब्लॉक’ केला. सुदैवाने, यादरम्यान वाघ आक्रमक झाला नाही. जर त्याने हल्ला केला असता तर त्याला जबाबदार कोण होते, असा सवाल उपस्थित होत आहे.(govt)
महसुलासाठी वाघाच्या स्वातंत्र्यावर गदा
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन प्रामुख्याने महसूल वाढीसाठी धडपडते. महसुलाचे टार्गेट गाठण्यासाठी वाघाचे स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप करीत वन्यप्रेमींनी व्याघ्र प्रकल्पातील नियमावलीचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे.


नियमांचे सर्रास उल्लंघन
वाघ बघण्याच्या स्पर्धेत पर्यटकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. अशा घटना वारंवार घडूनही ताडोबा प्रकल्पाचे व्यवस्थापन सुस्त आहे. नियम मोडणाऱया एकाही पर्यटकावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे.

हेही वाचा :

7 तासांत 15 निष्पाप मुलांचा बळी; सरकारी यंत्रणा ठरतेय फेल…

एक शो दोन विजेते, ‘Dance Deewane 4’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं

वीस वर्षांपूर्वी निधन झालेल्या ‘या’ अभिनेत्रीसारखी हुबेहूब दिसते आराध्या