आज मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल(fuel) आणि डिझेलच्या किमतीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा तर काहींच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील नाशिक, परभणी या शहरांत पेट्रोलचा भाव वाढल्याचे दिसून आले आहे. तर बुलढाणा शहरात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बुलढाण्यात पेट्रोल स्वस्त(fuel) झाल्याचे चित्र दिसते आहे. २५ मे २०२४ रोजी बुलढाण्यात पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०६.०२ रुपये होती. तर आजच्या तारखेला पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०४.७३ रुपये आहे.तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत आज पेट्रोल-डिझेलचा दर काय आहे एकदा तपासून घ्या.
महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कधी दिलासा मिळतो याची सर्वसामान्य जनता आतुरतेने वाट पाहत असते. त्यातच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील अहमदनगर, यवतमाळ, सिंधुदुर्ग या शहरांत डिझेलची दरवाढ पाहायला मिळाली आहे.
अहमदनगरमध्ये डिझेलची किंमत आज ९१.३९ रुपये प्रति लिटर , यवतमाळमध्ये ९२.२० रुपये प्रति लिटर तर सिंधुदुर्ग या शहरांत ९२.४१ रुपये प्रति लिटर डिझेलची किंमत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या तिन्ही शहरातील नागरिकांना दरवाढीचा फटका बसू शकतो असे चित्र दिसत आहे.
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.८८ | ९१.३९ |
अकोला | १०४.०५ | ९०.६२ |
अमरावती | १०५.०५ | ९१.५८ |
औरंगाबाद | १०५.१० | ९१.६० |
भंडारा | १०४.९३ | ९१.४६ |
बीड | १०५.८२ | ९२.३० |
बुलढाणा | १०४.७३ | ९१.२७ |
चंद्रपूर | १०४.४४ | ९१.०० |
धुळे | १०४.४५ | ९०.९८ |
गडचिरोली | १०५.१६ | ९१.६९ |
गोंदिया | १०५.५९ | ९२.०९ |
हिंगोली | १०४.९९ | ९१.५१ |
जळगाव | १०५.६५ | ९२.१३ |
जालना | १०५.७४ | ९२.२१ |
कोल्हापूर | १०४.३९ | ९०.९४ |
लातूर | १०५.२९ | ९१.८० |
मुंबई शहर | १०४.२१ | ९२.१५ |
नागपूर | १०३.९८ | ९०.५४ |
नांदेड | १०५.८१ | ९२.३१ |
नंदुरबार | १०५.१७ | ९१.६७ |
नाशिक | १०४.६९ | ९१.२० |
उस्मानाबाद | १०५.२८ | ९१.७९ |
पालघर | १०३.९७ | ९०.४८ |
परभणी | १०७.३९ | ९३.७९ |
पुणे | १०३.६९ | ९०.४१ |
रायगड | १०३.७८ | ९०.२९ |
रत्नागिरी | १०५.५२ | ९१.९६ |
सांगली | १०४.४२ | ९०.४७ |
सातारा | १०५.०७ | ९१.५६ |
सिंधुदुर्ग | १०५.९२ | ९२.४१ |
सोलापूर | १०४.१२ | ९०.६७ |
ठाणे | १०३.८९ | ९०.४० |
वर्धा | १०४.४४ | ९०.९९ |
वाशिम | १०४.५७ | ९१.११ |
यवतमाळ | १०५.७० | ९२.२० |
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर नवीन दर जाहीर होतात व हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आजच्या किमती पाहता महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठलेला दिसत आहे. तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या आणि पेट्रोलची टाकी फूल करून घ्या.
हेही वाचा :
इथे गुन्हे “अंगावर” घेतले जातात!
दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; ‘या’ तारखांना विधानसभेचं मतदान?
‘अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे’, ठाकरे गटाचा हल्लाबोल