इचलकरंजीमध्ये नेत्याच्या विरोधात बोलणाऱ्याला धू धू धुतले

लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार? यावरून गावाच्या पारावर चर्चांपलीकडे(leader) जाऊन आता वादाच्याही घटना घडू लागल्या आहेत. तरीही निकालाचा फिव्हर वाढतच चालला आहेत. अशा राजकीय रस्सीखेचात विदर्भात एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, तरी देखील निकालाच्या चर्चा काही थांबेनात. इजलकरंजी शहरात तर एका माजी शहारध्यक्षाने अशाच एक चर्चेत आपल्या नेत्याच्या विरोधात बोलणाऱ्या तरुणाला बदड बदड बदडले.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा निवडणुकीचे(leader) मतदान पार पडले आहे. सर्वांना ४ जून रोजी होणाऱ्या निकालाची उत्सुकता आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेले ईर्ष्या कमी होत असताना इचलकरंजी मध्ये निकालावरून चांगलेच घमसान सुरू झाले आहे. आपल्या नेत्यांबद्दल विरोधात बोलणाऱ्या तरुणाची माजी शहराध्यक्षांनी धुलाई केल्याचे समोर आले आहे. धुलाई करणारे माजी शहराध्यक्ष एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. या संपूर्ण प्रकारामुळे इचलकरंजीतील वातावरण चांगलेच तापले आहे.

इचलकरंजीमधील ‘लबाड कट्टा’वर रोजच राजकीय चर्चा रंगतात. मात्र या गप्पांचे रूपांतर भांडणात झाल्याची चर्चा शहरभर आहे. या कट्यावर माजी शहराध्यक्षाच्या समोरच त्यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याबाबत उलट सुलट वक्तव एका तरुणाने केले. माजी शहराध्यक्षांनी त्या तरुणाच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. इथूनच वादाला सुरुवात झाली. एकमेकांबाबत सुरू असलेले आरोप प्रत्यारोप वाढतच जात होते.

तेव्हा तेथे उपस्थित लोकांनी वाद वाढण्याआधी मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वाद हमरी तुमरीपर्यंत येऊन पोहोचला. राग अनावर झालेल्या माजी शहराध्यक्षाने मग त्या तरुणाला चांगलाच चोप दिल्याची चर्चा लोक चवीने चघळत आहेत.

दोघांच्या हमरीतुमरी आणि वादामुळे कट्ट्याजवळ नागरिकांची गर्दी झाली होती. अखेर तिथे उपस्थित असणाऱ्या इतर नागरिकांनी मध्यस्थी केली आणि हा वाद थांबवला. या दोघांमधील वाद हा लोकसभेच्या निकालावरून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दोघांनीही हा वाद आपआपसांत मिटवून वादावर पडदा टाकला.

हेही वाचा :

दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; ‘या’ तारखांना विधानसभेचं मतदान?

‘अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे’, ठाकरे गटाचा हल्लाबोल

मॅच जिंकल्यानंतर शाहरुख झाला भावूक ; वडिलांच्या मिठीत लेक रडली