पुणे हिट अॅन्ड रन प्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप होत असतानाच ससून रुग्णालयातील(atmosphere) डॉक्टरही हिटलिस्टवर आले आहेत. अल्पवयीन आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप डॉक्टरांवर होत आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
यावरून मात्र काँग्रेस आमदार रवींद्र धंगेरकरांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री(atmosphere) हसन मुश्रीफ यांना टार्गेट केले आहे. मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने संबंधित डॉक्टर काम करत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यावरून चिडलेल्या हसन मुश्रीफांनी धंगरेकरांना माफी मागण्याचे आवाहन करत विधानसभेत धूळ चारण्याचा इशाराच दिला आहे.
यापूर्वी धंगेकरांनी ड्रग्ज प्रकरणी ससून प्रशासनाला धारेवर धरले होते. आता गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या रक्त नमुने बदलल्यावरून धंगेकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांच्यावरच तोफ डागली. ते म्हणाले, ससून रुग्णालयात ढिसाळ कारभार सुरू असल्याचे वर्षापासून सांगत आहे. सरकारला मात्र याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. ते येथील भ्रष्ट लोकांना वाचवण्यातच समाधान मानत आहेत. डॉ. अजय तावरे अनेक वर्षांपासून रिपोर्ट बदलण्याचे काम करत आला आहे. अशा व्यक्तिला या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफांनी या व्यक्तीला पदावर बसवले असल्याने त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. हा प्रचंड मोठा घोटाळा असल्याचा आरोपही आमदार धंगेकरांनी केला होता.
धंगेकरांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ चांगलेच भडकले. ते म्हणाले, हिट अॅन्ड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये बदल झाल्याने आमदार धंगेकरांनी माझ्यावर काही आरोप केले आहेत. संबंधित डॉक्टर माझ्या पाठिंब्यामुळेच गैरकामे करत असल्याचे ते म्हणाले. आता त्या डॉक्टरांवर खातेअंतर्गत चौकशी केली आहे. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. धंगेकरांनी प्रसिद्धीसाठी सनसनाटी आरोप करण्याची सवय आहे. त्यांनी दोन दिवसांत माफी मागावी. नाहीतर त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा हसन मुश्रीफांनी दिला आहे.
धंगेकरांनी केलेल्या आरोपांवर मुश्रीफांनी त्यांना शेलक्या शब्दात सुनावले. ते म्हणाले धंगेकर हे काँग्रेसचे आमदार आहेत. ते चांगले लोकप्रतिनिधी असतील असे वाटत होते. मात्र प्रसिद्धीसाठी ते कोणत्याही थराला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. पुण्यातील अपघाताचे प्रकरण Pune Porsche Car Accident झाले त्यावेळी मी बाहेर होतो. त्यामुळे ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार माझ्या आशीवर्दाने झाल्याचे म्हणणे चुकीचे आहे. आता त्यांना विधानसभेत पराभवाची धूळ चाखावी लागणार आहे, असे मत असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.
हेही वाचा :
मुंबई लोकलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीसमोर उभा ठाकला विचित्र प्रसंग
कागलमध्ये विधानसभेचं वारं; महायुतीतच ‘बिग फाईट’, घाटगे-मुश्रीफ लागले कामाला…
इचलकरंजीमध्ये नेत्याच्या विरोधात बोलणाऱ्याला धू धू धुतले