राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीचा निकाल (10th result)आज जाहीर झाला. राज्यात यंदा कोल्हापूर विभागाने 97.45 टक्के गुणांसह दुसऱया स्थानावर बाजी मारली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोल्हापूर विभागाच्या निकालात 0.72 टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी कोल्हापूर विभागाचा दहावीचा निकाल एकूण 96.73 टक्के लागला होता. या विभागात मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिह्यांचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागात यंदाही कोल्हापूर जिल्हा 98.20 टक्के गुणांसह प्रथम स्थानावर राहिला, तर सातारा 97.19 टक्के गुणांसह दुसऱया आणि सांगली 96.66 टक्के गुणांसह तिसऱया स्थानावर राहिला.(10th result)
कोल्हापूर विभागात एकूण दोन हजार 327 माध्यमिक शाळांच्या 356 परीक्षा केंद्रांवर दहावीच्या परीक्षा पार पडल्या. यामध्ये सातारा जिह्यात 739 माध्यमिक शाळांच्च्या 116 केंद्रांवर, सांगली जिह्यातील 652 माध्यमिक शाळांच्या 103 केंद्रांवर, तर कोल्हापूर जिह्यातील 936 माध्यमिक शाळांच्या 137 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा पार पडली.
कोल्हापूर विभागात यंदा दहावीच्या परीक्षेत कॉपीसंदर्भात एकूण सात प्रकरणे आढळली. यामध्ये सातारा 4, सांगली 2 आणि कोल्हापुरातील एका गैरप्रकाराचा समावेश आहे.
उत्तीर्ण रिपिटर्समध्ये सातारा विभाग पहिला
रिपिटर विद्यार्थ्यांमध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिह्यांतील एकूण एक हजार 993पैकी एक हजार 965 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यांतील एकूण एक हजार 255 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेत सातारा जिल्हा 67.79 टक्के गुणांसह प्रथम स्थानावर राहिला, तर कोल्हापूर 66.33 टक्क्यांसह दुसऱया आणि सांगली जिल्हा 56.86 टक्के गुणांसह तिसऱया स्थानावर राहिला. रिपिटर विद्यार्थ्यांमध्ये सातारा जिह्यातील 660पैकी 652 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यांतील 442 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सांगली जिह्यात 620पैकी 612 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यांतील 348 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, कोल्हापूर जिह्यात 713पैकी 701 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यांतील 465 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यंदाही मुलींचीच बाजी
या वर्षी कोल्हापूर विभागातून नोंदणी झालेल्या एकूण एक लाख 28 हजार 280पैकी एक लाख 27 हजार 818 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यांतील एक लाख 24 हजार 567 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 68 हजार 716पैकी 66 हजार 425 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी 96.66 टक्के राहिली, तर 59 हजार 102पैकी 58 हजार 142 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांची टक्केवारी 98.37 टक्के राहिली. दोन्हीच्या तुलनेत यंदाही मुलींनीच उत्तीर्ण होण्यात 1.71 टक्क्यासह बाजी मारली.
कोल्हापूर विभाग
कोल्हापूर – 98.20 टक्के
सातारा – 97.19 टक्के
सांगली – 96.66 टक्के
हेही वाचा :
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड EX पत्नी बेस्ट फ्रेंड्स! एकमेकांना ‘या’ नावानं मारतात हाक
भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल