कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणावरून काँग्रेसचे(down) आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी रवींद्र धंगेकर यांना जाहीर माफी मागा, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेल, असा इशारा दिला होता. त्यावर आमदार धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी(down) या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या सॅम्पलमध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे. यावरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने ससून मध्ये हे दोन डॉक्टर काम करत होते, असा आरोप केला आहे. या आरोपानंतर मुश्रीफ यांनी रवींद्र धंगेकर हे स्टंटबाजी करत असून काही खोटे आरोप माझ्यावरती करत आहेत. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांच्या आत माफी मागवावी, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, ससून मध्ये घडलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली आहे. ही समिती मंगळवारी सकाळी ससून मध्ये दाखल झाली. या समितीची आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमंशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना आमदार धंगेकर म्हणाले, हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ नेते आहे.
मात्र ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना सोडून पळून का गेले? हे सर्वांनाच माहिती आहे. ते आदरणीय आहेत, त्यामुळे मी त्यांची माफी नाही तर त्यांना दंडवत घालीन त्यांच्या पाया पडेल, पण पुण्यामध्ये सुरु असलेली पब-संस्कृती संपली तर मी हे करेल.
त्यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत हसन मुश्रीफ यांनी तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असे सांगितलं आहे. या प्रश्नाला उत्तर देताना आमदार धंगेकर म्हणाले, अब्रु नुकसानीचा दावा त्यांनी दाखल करावा, परंतू माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काहीच नाही, अशी खोचक टिपण्णी देखील आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
हेही वाचा :
CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार!
कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ वादातून वृद्ध आईचा मुलाने केला खून