मतदानाची वेळ गैरसोयीची,वेळेत बदल करा

मुंबई (mumbai)पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे.

या निवडणुकीच्या मतदानाची वेळ ही सकाळी 8 ते दुपारी 4 अशी ठेवण्यात आली आहे. या वेळेत बहुतेक जण हे नोकरीत व्यस्त असतात तसेच खासगी किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱया व्यक्तींना कंपनी सुट्टी देत नाही. त्यामुळे गैरसोयीची ठरणारी ही वेळ बदलून मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 अशी करावी, मागणी शिवसेना नेते सचिव अनिल देसाई यांनी दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.(mumbai)

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 26 जूनला जाहीर झाली आहे. यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र शिक्षक तसेच पदवीधर असलेले मतदार हे आपापल्या कामाची ठिकाणी व्यस्त असतात. त्यामुळे सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठेवल्यास मतदाराला सकाळी कामावर जाण्याआधी किंवा संध्याकाळी कामावरून आल्यानंतरही मतदान करता येईल. त्यामुळे मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही आणि मतदानाची टक्केवारीही आपोआप वाढेल. त्यामुळे सर्वांना गैरसोय ठरणारी ही वेळ बदलून मतदारांना दिलासा द्यावा. याबाबत नव्याने वेळापत्रक काढून ते मतदारांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शिवसेना नेते-सचिव अनिल देसाई यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा :

आंबट-गोड चवीचे औषधी गुणधर्माचे जांभूळ; कोणते आहेत आरोग्यदायी फायदे?

भिवंडीत भाजप उमेदवाराचा बोगस मतदानाचा आरोप; म्हणाले….  

आयपीएल 2024 प्लेऑफमध्ये विराट कोहलीचं ‘मिशन 266’!