घरातील कुलदैवतेच्या पाया पडू द्या; सासूची हायकोर्टात धाव

घरातील(the house) कुलदैवतेच्या पाया पडू द्या, अशी विनवणी करणारी याचिका सासूने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सुनेने सासू-सासऱयाला घराबाहेर काढले आहे. सासूच्या याचिकेवर आज, गुरुवारी सुनावणी होणार आहे.

ऍड. स्वप्ना कोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. पतीला कर्करोग आहे. त्यांचा श्वास कधी थांबेल याची शाश्वती नाही. घरातील कुलदैवतेचे दर्शन घेऊन नतमस्तक व्हायचे आहे, पण सून घरात घेत नाही. किमान कुलदैवतेच्या पाया पडण्यासाठी तरी घरात घेण्याचे आदेश न्यायालयाने सुनेला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती ऍड. कोदे यांनी न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर बुधवारी केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.(the house)

याचिकाकर्ती सासू पतीसोबत पेण येथे सध्या नातलगांकडे वास्तव्य करत आहे. त्यांचे तेथून काही अंतरावर हक्काचे घर आहे. त्या घरात कुलदैवता आहे. लहान मुलगा व सून या घरात राहतात. सून सतत वाद घालायची. अखेर तिने आम्हाला घराबाहेर काढले. गेल्या वर्षी पतीला कर्करोगाचे निदान झाले. परिस्थिती बिकट आहे. तरीही सून घरात घेत नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

90 वर्षे जुने घर

कुलदैवता असलेले पेण येथील घर 90 वर्षे जुने आहे. हे घर माझ्या सासऱयांचे आहे. सासऱयाने हे घर माझ्या लहान मुलाला दिले. आम्ही आधी मुंबईत राहत होतो. नंतर या घरात राहायला आलो. तेथेच सुनेचा दवाखाना आहे. नातू आजारी आहे. त्यालाही सून भेटू देत नाही. त्यालाही भेटायचे आहे, अशी विनंती सासूने केली आहे.

हेही वाचा :

शाहरुखचा लेक करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट? ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

भयंकर उकडतंय… म्हणत उर्फीचा नको ‘तो’ प्रकार; ट्रोलर्स म्हणाले, आता एवढंच बाकी होतं..

मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; गजानन राणेंसह इतर २० साथीदारांवर गुन्हा