कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान(political) येत्या शनिवारी होणार आहे. त्यानंतर मंगळवार दिनांक 4 जून रोजी मतमोजणी होईल आणि अठराव्या लोकसभेत बहुमत कोणाचे याचा निकाल लागेल. भारतीय जनता पक्षाकडून शत प्रतिशत विजयाचा दावा केला जात असताना महायुतीमध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून वेगळाच सूर लावण्यात आल्याने भारतीय जनता पक्षात काहीशी अस्वस्थता आहे. सहनही होत नाही आणि स्पष्टपणे सांगता ही येत नाही अशी अवस्था देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुका जाहीर(political) झाल्याच्या पहिल्या दिवसापासून इंडिया आघाडी हरणार आणि आम्ही जिंकणार असे सांगायला सुरुवात केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीचा पासवर्ड टप्पा पूर्ण झाल्यानंतर आम्ही बहुमत मिळवले आहे असा दावा केला आहे. मात्र महाराष्ट्रात भाजप बरोबर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित दादा पवार यांनी”लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज ब्रह्मदेवाला सुद्धा लावता येणार नाही”असे स्पष्टपणे सांगून भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांचा अप्रत्यक्षपणे मुखभंग केलेला आहे. अजितदादा पवार हे इतकेच सांगून थांबलेले नाहीत, तर अल्पसंख्यांक समाज हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर या निवडणुकीत होता.
अर्थात तो भारतीय जनता पक्षाबरोबर नव्हता असे त्यांनी म्हटले आहे. या लोकसभा निवडणुकीतील प्रचारात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या विरुद्ध टोकाची विधाने केली होती. त्यामुळेच हा समाज महायुती बरोबर नव्हता असे त्यांना अप्रत्यक्षपणे सांगावयाचे आहे. पण त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे दिनांक 10 जून रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील असे परस्पर विरोधी विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना नेमके काय सुचवायचे आहे हेच कळण्याच्या पलीकडे आहे.
नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर या देशाचे संविधान बदलले जाईल हा इंडिया आघाडीकडून केल्या गेलेल्या प्रचारामुळे दलित समाज हा नाराज आहे, दलितांची अशा प्रकारची नाराजी असतानाच महाराष्ट्र सरकारकडून पाठ्यपुस्तकात मनुस्मृति मधील श्लोक आणले जाणार आहेत, त्याचेही प्रतिकूल परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतात असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे.
मनुस्मृती मधील विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवणारे एक दोन श्लोक पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जाणार आहेत. तथापि मनुस्मृतीचे आम्ही कोणीही समर्थन करत नाही असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केल्यानंतरही अजितदादा पवार यांनी, पाठ्यपुस्तकात मनुस्मृति आणाल तर खपवून घेणार नाही असा इशाराच दिला आहे आणि तो महायुतीला घरचा आहेर असल्याचे समजले जाते.
एकूणच लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील टप्पे पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित दादा पवार आणि छगन भुजबळ यांनी वेगळा सूर लावल्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजवले जाणार आहेत. तथापि आत्तापासूनच जागा वाटपाबद्दल महायुतीमध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या भारतीय जनता पक्षावर राष्ट्रवादीकडून दबाव टाकला जातो आहे. छगन भुजबळ यांनी आम्हाला 80 ते 90 जागा मिळाल्या पाहिजेत असे जोरदारपणे म्हटले आहे.
महायुतीमध्ये आमच्या पक्षाच्या सर्वाधिक जागा असल्यामुळे, आम्हाला ज्यादा जागा मिळणे अभिप्रेत आहे. तथापि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांचाही जागा वाटपात योग्य तो सन्मान राखला जाईल असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचे संदर्भ बदलणार आहेत. अजित दादा पवार आणि छगन भुजबळ यांनी त्याचे सुतोवाच केलेले आहे.
महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी यापूर्वी शाळांमध्ये सरस्वतीच्या प्रतिमा कशासाठी? असा सवाल उपस्थित करून खळबळ उडवून दिली होती, आणि आता तर पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृति मधील दोन श्लोक समाविष्ट करण्यात येणार आहेत असे समजल्यावर त्यांना एक मोठा मुद्दा, मिळालेला आहे. विशेष म्हणजे पाठ्यपुस्तकात दोन श्लोक घेण्याबद्दलचा विषय हा त्यांच्याच सरकारने घेतलेला आहे. मनुस्मृतीचे कोणीही समर्थन करणार नाही. पण जणू काही मनुस्मृतीचे उदातीकरण केले जात आहे अशा समजुतीत काहीजण आहेत. त्यांचा गैरसमज दूर करण्याची जबाबदारी सरकारवर आहे.
हेही वाचा :
माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोर फरार
हायकोर्टात मिळाला न्याय; व्याकुळ आई बाळाला कुशीत घेऊन सुखावली
वाचा, मोदी काय म्हणाले; चित्रपट आला म्हणून महात्मा गांधी जगाला कळले!