आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक कुत्र्याच्या गळ्यात फोटो अडकवून निषेध

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांन महाडमध्ये (challenges)मनुस्मृती दहन करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा प्रकार घडला. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी माफी मागताना अनावधानाने घडल्याचं म्हटलंय. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीविरोधात भाजपकडून राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ भाजप रस्त्यावर उतरलं असून काही ठिकाणी गुन्हाही दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करावाई करावी अशी मागणी केली जात आहे

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानं जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कलम 504 अन्वये शांततेचा भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान केल्या प्रकरणी आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

धुळ्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात(challenges) आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कुत्र्याच्या गळ्यात जितेंद्र आव्हाड यांचा फोटो घालून जोरदार घोषणाबाजी केली. तसंच संतप्त कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन कऱण्यात आलं. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडल्याच्या निषेधार्थ भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे.

सोलापुरात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजप(challenges) आक्रमक झाले आहे. सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महायुतीचे पदाधिकारी एकत्र येऊन जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मीरा भाईंदर शहरात भाजप मार्फत आव्हाड यांच्या विरोधात गोल्डन नेस्ट येथे आंदोलन करण्यात आले .आव्हाड यांच्या फोटो ला भाजपच्या महिलांनी चपला मारत जोडे मार आंदोलन केले आहे.

हेही वाचा :

बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; तटकरेंच्या दाव्याने खळबळ

सांगलीत लोकसभा निकालाआधीच महायुतीत उडाले खटके…

सावधान! गुगल मॅप वापरत असाल तर ; गमवावे लागतील प्राण, नेमकं काय घडलं