आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2024 सुरू होण्यास अवघे दोन दिवसच(tournament) उरले आहेत. तोपर्यंत टी 20 वर्ल्डकपमधील एक संघ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आयसीसीने युगांडा देशाच्या जर्सीवर बंदी घातली. त्यामुळं त्यांना आपली जर्सी त्वरित बदलावी लागली. युगांडा क्रिकेट बोर्डाकडे जर्सी बदलण्यास फार वेळ शिल्लक नव्हता. त्यामुळं आहे त्या जर्सीत त्यांना थोडा बदल करावा लागला.

आयसीसी टी 20 वर्ल्डकप(tournament) 2024 साठी युगांडाने ज्या जर्सीचे अनावरण केलं होतं त्या जर्सीच्या शोल्डरवर एका पक्ष्याचं डिझाईन होतं. मात्र या डिझाईनमुळे स्पर्धेच्या एका स्पॉन्सरचा लोगो दिसत नव्हता. त्यामुळं आयसीसीने युगांडाच्या जर्सीवरच बंदी घातली.

युगांडाची जर्सी त्यांचा राष्ट्रीय पक्षी ग्रे क्राऊन क्रेनपासून प्रेरणा घेत डिझाईन केली होती. मात्र आता आयसीसीने बंदी घातल्यावर त्यांनी आपल्या जर्सीत बदल केला आहे. संघाकडेे जर्सी पूर्णपणे बदलण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळं जर्सीत 20 टक्के बदल करून जर्सी तयार करण्यात आली आहे.

युगांडाचा संघ पहिल्यांदाच टी 20 वर्ल्डकप सारख्या मोठ्या स्पर्धेत खेळत आहे. युगांडा हा ग्रुप C मध्ये असणार आहे. या ग्रुपमध्ये वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी आणि अफगाणिस्तान सारखा संघ आहे. युगांडाने आफ्रिका क्वालिफिायरमध्ये जबरदस्त कामगिरी करत टी 20 वर्ल्डकपच्या मुख्य फेरीत प्रवेश केला होता. युगांडा दुसऱ्या स्थानावर राहिली होती. आता टी 20 वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी युगांडा संघ उत्सुक आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत काळ्या ओढ्यातील कचरा काढण्याचे काम सुरू

आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक कुत्र्याच्या गळ्यात फोटो अडकवून निषेध

अभिमानास्पद….‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपट ठरला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला मराठी चित्रपट