मोदींनी 758 वेळा वाजवली स्वत:च्याच नावाची ‘थाळी’!

पंतप्रधान मोदी (modi)ध्यानधारणेला बसले असतानाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज मोदींनी प्रचारादरम्यान केलेल्या ‘नामजपाचे’ पोस्टमॉर्टम केले. गेल्या 15 दिवसांत मोदींनी 232 वेळा काँग्रेस नावाचा उल्लेख केला, 573 वेळा ‘इंडिया’ आघाडीच्या नावाने बोटे मोडली, तर 421 वेळा मंदिर, मशीद, मुस्लिम यावरून टीका केली. प्रचारात मोदींचा मीपणा दिसून आला. त्यांनी तब्बल 758 वेळा स्वतःच्याच नावाची ‘थाळी’ वाजवत स्वस्तुती केली. या भाषणबाजीत महागाई व बेरोजगारीबद्दल मात्र त्यांनी तोंडावर बोट ठेवले, अशी तोफ खरगे यांनी डागली.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खरगे यांनी मोदींवर(modi) निशाणा साधला. भाजप आणि मोदींचा लोकसभा निवडणुकीतील प्रचार पाहिल्यास त्यात फक्त काँग्रेस, ‘इंडिया’ आघाडी आणि विरोधी पक्षांच्या नावाने बोटे मोडण्याचे काम करण्यात आले. महागाई आणि बेरोजगारीवर अवाक्षरही त्यांनी काढले नाही. त्यावरून जनतेच्या प्रश्नांची सत्ताधाऱयांना किती काळजी आहे हे दिसून आले, अशा शब्दांत खरगे यांनी हल्ला चढवला.
मोदींनी धर्माच्या आधारावर उघडपणे प्रचार केला. 421 वेळा त्यांनी मंदिर, मशीद तसेच विविध धर्मांचा भाषणात उल्लेख करत धर्म आणि समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 224 वेळा मुस्लिम पाकिस्तान, मायनॉरिटींच्या नावानेही त्याच्या भाषणातून बोंब ठोकली गेली. तरीही निवडणूक आयोगाने कोणतेही पाऊल उचलले नाही. आयोगाचे हे वागणे निष्पक्ष होते का याचे उत्तर येत्या काळात देशातील जनताच देईल, अशा शब्दांत खरगे यांनी नाराजी व्यक्त केली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पक्षाचे अन्य नेते पंतप्रधान मोदी हे देवाचा अवतार असल्याचे म्हणतात. ही केवळ अंधभक्तीच नाही तर अंधश्रद्धा वाढवणारी बाब आहे, असा निशाणा खरगे यांनी साधला.

4 जूननंतर मोदी आणि भाजपच्या नेत्यांना महात्मा गांधी यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी बराच वेळ असेल, असा टोला खरगे यांनी लगावला. गांधीजींवर चित्रपट येईपर्यंत ते कुणाला माहीत नव्हते याचा मोदींच्या विधानाचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. कारण मोदींना गांधीजींबद्दल माहिती असती तर ते संविधान, स्वातंत्र्य, अहिंसा, विकास, गरीब, दलित यावर प्रचारात बोलले असते. मोदींच्या प्रचारात गांधीजी आणि भारत कुठेच नव्हता. त्याचे कारण म्हणजे सत्य मोदींना पचत नाही आणि अहिंसा त्यांच्या पक्षाला मान्य नाही, असा टोला खरगे यांनी हाणला.
मोदींनी धर्माच्या आधारावर उघडपणे प्रचार केला. तरीही निवडणूक आयोगाने कोणतेही पाऊल उचलले नाही. आयोगाचे हे वागणे निष्पक्ष होते का याचे उत्तर देशातील जनताच देईल.
573 वेळा इंडिया आघाडीच्या नावाने बोटे मोडली

काँग्रेस नामाचा जप
15 दिवसांत
232 वेळा उल्लेख

421 वेळा मंदिर, मशीद आणि धर्मावरून टीका
224 वेळा मुस्लिम, पाकिस्तान, माइनॉरिटीच्या नावाने बोंब

हेही वाचा :

बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; तटकरेंच्या दाव्याने खळबळ

सांगलीत लोकसभा निकालाआधीच महायुतीत उडाले खटके…

सावधान! गुगल मॅप वापरत असाल तर ; गमवावे लागतील प्राण, नेमकं काय घडलं?