मुलाच्या लग्नासाठी घेतले होते उधार पैसे, प्रसिद्ध निर्मात्याचा  कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

सनी देओल हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. सनी देओल सध्या (producer)चर्चेत आला आहे. सनी देओलने मुलगा करणच्या लग्नासाठी पैसे घेतल्याचा आरोप प्रसिद्ध निर्मात्याने केला आहे.

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सनी देओल नेहमीच चर्चेत असतो. सनी देओलवर आता फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. एका प्रसिद्ध निर्मात्याने सनी देओलवर आरोप केला आहे. जवळपास २.२५ कोटींची फसवणूक सनी देओलने केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सनडाउन एंटरटेंनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मालक, रिअल इस्टेट डेव्हलपर सौरव गुप्ता यांनी हे आरोप केले आहेत. सनी देओललला त्याच्या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट दाखवण्यात आला. त्यानंतर सनी देओलने ४ कोटी रुपयांचे मानधन घेऊन चित्रपट करण्यास होकार दिला. त्यानंतर सनी देओल १ कोटी रुपये अॅडव्हान्स दिले होते. परंतु अभिनेत्याने शुटिंग सुरुच केले नाही, असं सौरव गुप्ता यांनी सांगितले.

सनी देओलने चित्रपटासाठी अडव्हान्स पैसे घेतले परंतु तो चित्रपटाच्या शुटिंगला आलाच नाही. याउलट तो पोस्टर बॉईज या चित्रपटाच्या शुटिंगसाठी गेला, असा दावा सौरव गुप्ता यांनी केला आहे.

सौरव गुप्ता यांनी सांगितले की, २०२२ मध्ये या चित्रपटाबाबत (producer)बोलणी झाली आहे. त्यानंतर सनी देओलने आम्हाला सांगितले की, तुम्ही चित्रपटाचा दिग्दर्शक बदला आणि स्क्रिप्टवर पुन्हा एकदा काम करा. परंतु २०२३ मध्ये सनी देओलनेच आम्हाला ही आयडिया सुचवली होती. या चित्रपटाचे नाव ‘रामजन्मभूमी’ असे असणार होते. चित्रपटाचे एकूण बजेट ४० कोटी रुपये असणार होते.

‘रामजन्मभूमी’ या चित्रपटाचे शुटिंग फिल्मीस्तान या स्टुडिओमध्ये होणार होते. दिग्दर्शक आणि सेटवरील अनेक लोकांना पैसे देण्यात आले. सनी देओलने चित्रपटात काम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नंतर स्वतः ची फी वाढल्याचे सांगितले. त्यामुळे चित्रपटातून जी कमाई होईल त्यातून दोन कोटी रुपये मिळती असा करार झाला होता, असा दावा सौरव यांनी केला आहे.

मुलगा करणच्या लग्नासाठी घेतले होते पैसे

सनी देओलने मुलगा करणच्या लग्नासाठी ५० लाख रुपये मागितले होते. (producer)या चित्रपटातून निर्मात्यांना खूप फायदा होईल, असं त्याने सांगितले. त्यामुळे आम्ही त्याला ५० लाख रुपये दिले.

कराराची कॉपी

सौरव गुप्ता यांनी सांगितले की, चित्रपटाचा संपूर्ण करार झाला. त्यानंतर हार्ड कॉपी समोर येताच आम्हाला धक्का बसला. त्यात सनी देओलने नफ्यातून २ कोटी रुपयांसह त्याचे मानधन वाढवून ८ कोटी रुपये केले होते. याशिवाय आणखी १ कोटी रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले. मी सनी देओलला भेटण्याचा प्रयत्न केला, त्याच्या टीमशी संपर्क साधला परंतु त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. या प्रोजेक्टवर आम्ही जवळपास २५ कोटी रुपये खर्च केले आहे. ज्यातील २.२५ कोटी रुपये सनी देओलने घेतले होते.

हेही वाचा :

बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; तटकरेंच्या दाव्याने खळबळ

सांगलीत लोकसभा निकालाआधीच महायुतीत उडाले खटके…

सावधान! गुगल मॅप वापरत असाल तर ; गमवावे लागतील प्राण, नेमकं काय घ