अगा जे घडणारच नाही, त्यावर गदारोळ कशासाठी?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पिण्याच्या(water) पाण्याचे गंभीर संकट, हंडाभर पाणी मिळवण्यासाठी तीन-चार किलोमीटरची महिलांची पायपीट, अवकाळी पावसाने आडव्या झालेल्या केळीच्या बागा, गारपिटीने झोपलेली, धाराशयी पडलेली उभी पिके, बांधावर बसून धाय मोकलून रडणारा शेतकरी, यापेक्षाही महाभयंकर समस्या महाराष्ट्रातील काही राजकारण्यांनी शोधून काढली आहे आणि ती म्हणजे मनुस्मृति. जे कधीही घडणार नाही, ते नक्की घडणारच अशी आततायी भूमिका घेऊन काहीजण आंदोलनात उतरले होते आणि त्याच्या गुरुवारी राज्यभर आंदोलनात्मक प्रतिक्रिया उमटल्या. आणि त्याचा ताण पोलीस प्रशासनावर पडला.

स्त्रिया आणि शूद्र यांच्याविषयी कमालीचा तिरस्कार, विकृत विचार म्हणून स्मृतीमध्ये मांडला गेला आहे(water). अगदी ब्राह्मण वर्गाने सुद्धा त्याचा फार पूर्वीपासूनच निषेध व्यक्त केला आहे. हा मनुस्मृति ग्रंथ कुठेही अगदी सहजपणे उपलब्ध होत नाही आणि तो सर्रास वाचला जात नाही किंवा वाचला गेलेला नाही. आणि तो श्लोकाच्या माध्यमातून लिहिण्यात आल्याने त्याचे वाचणाऱ्यास नीट आकलन होतेच असे नाही. आज रस्त्यात अडवून शंभर जणांना “तुम्ही मनुस्मृति वाचली आहे काय?”असा प्रश्न विचारला तर 100 पैकी 99 लोक म्हणतील आम्ही हा ग्रंथ वाचलेला नाही. त्यातीलच अनेक जण हा काय प्रकार आहे असे म्हणतील आणि एखादा म्हणेल हा ग्रंथ मी वाचलेला नाही पण त्याच्याबद्दल काही ऐकलेले आहे.

अनेक राजकीय नेते असे आहेत की त्यांनी हा ग्रंथ वाचलेला नाही. हा ग्रंथ त्यांच्या नजरेखालून सुद्धा गेलेला नाही आणि तरीही ऐकीव माहिती वर तथाकथित प्रतिगाम्यांना झोडपून काढण्यासाठी त्यांच्याकडून मनु स्मृतीचा उल्लेख केला जातो. वास्तविक मनुस्मृति मधील एक दोन मूल्य संस्कार करणारे श्लोक पाठ्यपुस्तकात घेण्यात यावेत अशी शिफारस करण्यात आली आहे आणि हे श्लोक पाठ्यपुस्तकात घेण्याचा विचार पाठ्यपुस्तक मंडळांने बोलून दाखवला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा विचार बोलून दाखवला आणि त्यांनी काही जणांना आंदोलन करण्यासाठी टोकाची प्रतिक्रिया देण्यासाठी एक कळीचा मुद्दा सोपवला आहे.

शिवसेना आणि भाजपचे युतीचे सरकार इसवी सन 1995 मध्ये महाराष्ट्रात होते. तेव्हा मुख्यमंत्री मनोहर पंत जोशी आणि केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी शालेय अभ्यासक्रमात मूल्य संस्कार करणारा धडा असला पाहिजे असा विचार बोलून दाखवला होता. पण तेव्हाही तथाकथित पुरोगामी कळवा विरोध केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड हे वादग्रस्त वक्तव्यासाठी अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत(water). औरंगजेब याच्या छत्रपती संभाजी नगर मधील निवासस्थानाचा जीर्णोद्धार केला पाहिजे अशी भूमिका त्यांनी दीर्घ दोन वर्षांपूर्वी मांडली होती. मनुस्मृति मधील काही श्लोक पाठ्यपुस्तकात घेण्याबद्दलची नुसती शिफारस करण्यात आल्यावर आव्हाड यांनी जणू ही महाराष्ट्रावर आलेली महाभयंकर आपत्ती आहे, समस्या आहे असे समजून महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे परिसरात मनुस्मृति जाण्याचे आंदोलन केले. हे आंदोलन करताना आपण काय करत आहोत याचे त्यांना भान राहिले नाही. आंदोलनाच्या वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून तिचे दहन केले.

ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी विना विलंब माफी ही मागितली आहे. त्यांच्याकडून अनावधानाने घडलेली ही कृती आता भारतीय जनता पक्षासाठी आंदोलनाचा विषय ठरली आहे. गुरुवारी कोल्हापूर सह राज्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. आव्हाड हे भाजपचे राजकीय शत्रू असल्याने त्यांच्या विरोधी आंदोलनास गुरुवारी एक वेगळीच धार आली होती. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आव्हाड यांच्या कृतीचा निषेध केला आहे तर आंबेडकरी चळवळीतील काही जणांनी ही अनावधानाने घडलेली सुख असल्याचे म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांना सतत मीडियासमोर यायचे असते. त्यासाठी ते नेहमी कारणे शोधत असतात. मनुस्मृतीच्या निमित्ताने त्यांना आयताच विषय मिळाला. त्यांनी केलेले आंदोलन चुकीचे आहे असे कोणीही म्हणणार नाही पण मनुस्मृती च्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वच प्रश्न सामान्य आहेत असेही कुणी समस्था कामा नये. आव्हाड यांनी महाड येथे आंदोलन केल्यानंतर त्याच परिसरातील एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन किंवा एखाद्या वाडी वस्तीवर जाऊन तेथील पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे, शेतीचा प्रश्न किती गंभीर आहे याची पाहणी केली असती तर, बरे झाले असते इतकेच.

हेही वाचा :

महाराष्ट्रातील ‘या’ भागात आज मुसळधार पावसाचा इशारा

लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये…; वर्ल्डकपपूर्वीच असं का म्हणतोय विराट कोहली?

मुलाच्या लग्नासाठी घेतले होते उधार पैसे, प्रसिद्ध निर्मात्याचा  कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप