अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील हिंगेमळ्यात तीन अज्ञात चोरट्यांनी(jewelery) घरफोडी करत तीन महिलांना मारहाण करून अंदाजे दोन ते सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे.
या मारहाणीत जेष्ठ महिलेच्या कानातील कुडी ओरबडून नेत असताना कान तुटुन गंभीर दुखापत झाली आहे ही घटना आज शुक्रवारी पहाटे दोन अडीच च्या सुमारास घडली आहे.
येथील हिंगेमळा परिसरात आज पहाटे दोनच्या सुमारास एकनाथ विष्णू हिंगे यांच्या घरी तीन चोरट्यांनी भर लोकवस्तीत घरफोडी केली. एकनाथ हिंगे यांची दोन्ही मुले सचिन हिंगे व संदीप हिंगे हे मंचर येथील एका खासगी कंपनीत कामाला असल्यामुळे रात्रीच्या वेळेस ते कामाला गेले होते.
याचा फायदा घेऊन, पाळत राखून तीन चोरट्यांपैकी एका चोरट्याने (jewelery)घराची भिंत व कौल याच्या फटी मधून घरात प्रवेश करून आतून घराची कडी उघडून घरात झोपलेल्या ज्येष्ठ महिला कुंदा एकनाथ हिंगे यांच्या कानातील सोन्याची कुडी ओरबडण्याच्या प्रयत्नात त्यांचा कान तुटला आहे व त्यांचे गळ्यातील सोन्याच्या वाट्या काढून घेतल्या आहेत हे घेताना चोरट्यांनी त्यांना काठीने मारहाण केली आहे.
बाजूच्या खोलीत झोपलेल्या अर्चना सचिन हिंगे, सारिका संदीप हिंगे या दोन्ही सुनांना चोरट्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गळ्यातील सोन्याच्या वाट्या काढून घेतल्या घरात असणाऱ्या लोखंडी व लाकडी कपाटाची उचका पाचक करून त्यात काही मिळाले नाही तर अर्चना हिंगे यांच्या लहान मुलाला मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांनी स्वतःहून त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने काढून दिले.एकनाथ हिंगे बाजूच्या खोलीत झोपले होते त्यामुळे त्यांना याची काहीची कुणकुण लागली नाही चोरटे गेल्यावर महिलांच्या ओरडण्याने त्यांना जाग आली.
या घटनेत हिंगे कुटुंबीयांचे सुमारे दोन ते सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. जाताना घराची बाहेरील कड्या लाऊन चोरटे अंधारात पळाले. या घटनेची माहिती कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदती साठी धाव घेतली परंतु तोपर्यंत चोरट्यांनी पलायन केले होते.
दरम्यान रात्री अडीचच्या सुमारास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे व कर्मचारी, पोलीस पाटील माधुरी जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली व परिसराची पाहणी केली.
मागील तीन महिन्यांपासून या परिसरात पोलिसांची रात्रीची गस्त बंद (jewelery)असल्याने चोरटे त्याचा फायदा घेत आहेत, अनेक वेळा नागरिकांनी रात्रीची गस्ती चालू करावी याबाबत मागणी केली असतानाही पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
हा सर्व परिसर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये येत असल्याने या परिसरात रात्रीची बिबट्याची मोठ्या प्रमाणावर दहशत असल्याने नागरिक शेजाऱ्यांच्या मदतीसाठी बाहेर पडत नाही. या घटनेमुळे तरी पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त पुन्हा चालू करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ‘या’ भागात आज मुसळधार पावसाचा इशारा
लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये…; वर्ल्डकपपूर्वीच असं का म्हणतोय विराट कोहली?
मुलाच्या लग्नासाठी घेतले होते उधार पैसे, प्रसिद्ध निर्मात्याचा कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप