७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी घेतला मोठा निर्णय

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे बॉलिवूडचं(couples therapy) लोकप्रिय कपल आहे. हे कपल कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. अशातच अर्जुन आणि मलायका त्यांच्या रिलेशनमुळे चर्चेत आले आहे. मलायका आणि अर्जुन यांच्यात १२ वर्षांचा फरक असल्यामुळे ह्या कपलला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण असं असलं तरीही इतकी वर्ष त्यांचं नात कधी डगमगलं नाही. पण आता त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या होत आहे.

मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपचे(couples therapy) वृत्त पिंकव्हिलाने दिलेलं आहे. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, या दोघांनीही तब्बल सात वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मलायका आणि अर्जुनने विभक्त होण्याचा निर्णय एकमेकांच्या सहमतीने घेतलेला आहे.

एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, मलायका आणि अर्जुनचे खूप खास नाते होते. विभक्त झाले असले तरी, दोघे कायमच एकमेकांचा आदर करतील. दोघांचं नातं फार काळ टिकलं, पण आता दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या पाच वर्षापासून अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत होते. २०१८ मध्ये, मलायकाच्या ४५ व्या वाढदिवशी दोघांनीही आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली होती. यापूर्वीही अनेकदा मलायका आणि अर्जुनच्या घटस्फोटाच्या चर्चा झालेल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर मलायका आणि अर्जुनच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होत आहे. मलायकाने सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. त्यांना अरहान नावाचा मुलगाही आहे. जो मलायकासोबत राहतो. अरबाजने गेल्या काही दिवसांपूर्वी शुरा खानसोबत दुसरं लग्न केलं.

हेही वाचा :

महाराष्ट्रातील ‘या’ भागात आज मुसळधार पावसाचा इशारा

लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये…; वर्ल्डकपपूर्वीच असं का म्हणतोय विराट कोहली?

मुलाच्या लग्नासाठी घेतले होते उधार पैसे, प्रसिद्ध निर्मात्याचा  कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप