सांगली लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मधील काँग्रेस(political) आणि शिवसेनेत वाद विकोपाला गेला असतानाच आता पुन्हा मतमोजणी प्रतिनिधीवरून घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. मंगळवारी चार जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूक निकाल २०२४ च्या मतमोजणीसाठी चंद्रहार पाटलांचा एकही उमेदवार प्रतिनिधी नसल्याचे आता उघड झाले आहे. घडलेल्या या प्रकारामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील(political) यांना मतमोजणी प्रतिनिधीच मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चार जून रोजी मिरजेतील वेअर हाऊस मध्ये मतमोजणी पार पडणार आहे. ८४ ईव्हीएम टेबल आणि २० टपाली टेबल अशा एकूण १०४ टेबलवर मतमोजणी घेण्यात येणार आहे.
या मतमोजणीसाठी प्रत्येक उमेदवाराने मतमोजणी प्रतिनिधी द्यायचे होते. त्यासाठी २७ मे पर्यंत उमेदवार मतमोजणी प्रतिनिधींची यादी मागविण्यात आली होती. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेचे सांगलीतील उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याकडून मात्र २७ मे रोजी मतमोजणी प्रतिनिधी यादी देण्यास विलंब झाला. त्यामुळे शासनाकडे चंद्रहार पाटलांच्या प्रतिनिधींची यादीच पोहोचलेली नसल्याचे समजते.
त्यामुळे चंद्रहार पाटील आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मतमोजणी प्रतिनिधी घेण्याची विनंती करणार असल्याचे देखील समजते. दरम्यान चंद्रहार पाटील यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती केली. तर त्यांचा प्रतिनिधी अर्ज देखील स्वीकारला जाऊ शकतो अशी देखील शक्यता आता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार!
कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ वादातून वृद्ध आईचा मुलाने केला खून