भाजपचं फसलेलं राजकारण?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा सातवा टप्पा शनिवारी सायंकाळी(politics) सहा वाजता संपल्यानंतर अवघ्या तासाभरात पाच वेगवेगळ्या सर्वेक्षण संस्थांचे(न्यूज चॅनेल्स) निकालाचे अंदाज विविध वृत्तवाहिन्यांवर जाहीर झाले. हे अंदाज महाराष्ट्र वगळता देशात भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला सुखावणारे आहेत.

महाराष्ट्रात मात्र भारतीय जनता पक्षाच राजकारण(politics) फासलेलं दिसतंय असं या अंदाजावरून म्हणता येईल. अर्थात त्याला अन्य घटकही कारणभूत ठरले आहेत. हे अंदाज येत्या मंगळवारी म्हणजे दिनांक चार जून रोजी बऱ्यापैकी खरे ठरले तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण नव्या वळणावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतीय जनता पक्षाचा “अब की बार, चारसौ पार”आणि महाराष्ट्रातील”अब की बार 45 पार”चा दावा फोल ठरणार असल्याचा अंदाज शनिवारच्या महा एक्झिट पोल ने व्यक्त केलेला आहे. पण त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची हॅट्रिक करतील आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज आहे. या महा एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर महाविकास आघाडीचा”अब की बार भाजप तडीपार”ही घोषणाच तडीपार होण्याची शक्यता आहे. तथापि महाविकास आघाडीने महायुतीला या निवडणुकीच्या निमित्ताने जमिनीवर आणले आहे असेही हे अंदाज सांगतात.

महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वाधिक जाहीर सभा झाल्या. काही ठिकाणी रोड शो झाले.व्होट जिहाद, ज्यादा पोरांची पैदास करणाऱ्या लोकांच्याकडे तुमचा पैसा जाणार, असे अल्पसंख्याक विरोधी मुद्दे त्यांनी प्रचार सभा मधून मांडले. त्यामुळे महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाज हा एका चिडीतून, महाविकास आघाडीकडे विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे वळला असे शनिवारच्या एक्झिट पोल अंदाजावरून स्पष्ट होते.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार वगैरे नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्यावर या निवडणूक प्रचारात हल्लाबोल केला होता. पक्ष फोडले, निवडणूक चिन्ह चोरले, भाजपा म्हणजे वाशिंग मशीन, संविधान धोक्यात आहे, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर या देशात पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत असे प्रमुख मुद्दे घेऊन महाविकास आघाडी निवडणूक प्रचारात जोरदारपणे उतरली होती. या सर्व नेत्यांनी दिनांक चार जून नंतर नरेंद्र मोदी सत्तेतून पायउतार होतील असे वारंवार अगदी ठामपणे सांगितले पण महा एक्झिट पोल च्या अंदाजानुसार या मंडळींचा भ्रमनिरास होणार आहे. नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हा अंदाज सर्वच सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला असला तरी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे असे एक्झिट पोल सांगतात.

भारतीय जनता पक्षाने शिवसेना हा मजबूत पक्ष फोडताना पैशाचा(politics) वारेमाप वापर केला. खोक्यांची भाषा आणली. हे सर्वसामान्य माणसाला पटवून देण्यात विरोधी पक्ष नेते यशस्वी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यावर ईडी हा फॅक्टर विरोधी नेत्यांनी प्रभावीपणे पुढे आणला. दोन पक्ष फोडल्यानंतर भाजपला फायदा होण्याऐवजी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना काही प्रमाणात सहानुभूती मिळाली. याशिवाय महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाज हा एका चिडीतून महाविकास आघाडीच्या मंडपात आला. सर्वसामान्य मतदाराला भाजपचे हे फोडाफोडीचे राजकारण फारसे रुचलेले नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले त्यांनाच जवळ घेतल्याचा रागही काही प्रमाणात मतदारांच्या मध्ये होता हे अंदाजावरून स्पष्ट होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झाली असे या अंदाजावरून म्हणता येईल.

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चांगले हात पाय पसरले होते. ग्रामीण मतदारांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले होते. पण या निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी भाजपवाला साथ दिलेली नसावी. कांदा आणि सोयाबीनचे पडलेले कोसळलेले दर, निर्यात धोरणातील धरसोड, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हे घटकही त्याच कारणीभूत ठरले असावेत. मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर मराठवाडा विभागात महत्त्वाचा ठरला असावा असे ह्या महा एक्झिट पोल अंदाजावरून म्हणता येईल.

महा एक्झिट पोलचा महाराष्ट्रातील अंदाज हा भाजप विरोधी आहे. हा अंदाज खरा ठरला तर महाराष्ट्रातले भाजपचे चाणक्य असलेले देवेंद्र फडणवीस यांचे फोडाफोडीचे राजकारण त्यांच्याच अंगलट आले आहे असे म्हणता येईल.
त्यातून पक्षातील त्यांचे महत्त्वही कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यासाठी ते शुभ संकेत ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

केळीच्या पानातील अन्न खाण्याचे आहेत ‘हे’ आरोग्यदायी फायदे

कोल्हापुरात शाहू महाराज, हातकणंगलेत सरूडकर? विविध ‘एक्झिट पोल’चा अंदाज

देशात सलग तिसऱ्यांदा मोदी लाट? 3 एक्झिट पोलमध्ये एनडीए 400 पार