लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी 1 जून रोजी संपली. त्यानंतर लागलीच एक्झिट पोलचा(country) पोळा फुटला. देशातील झाडून सर्वच एक्झिट पोलने भाजपला कौल दिला आहे. पण संजय राऊत यांना इंडिया आघाडीच देशात सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास आहे. त्यांनी आकडेवारी सादर करत हा बहुमताचा आकडा सुद्धा सांगितला. हा एक्झिट पोल नाही तर जनतेच्या मनातील कौल असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते इंडिया आघाडीला देशात इतक्या जागा मिळतील. त्याआधारे सत्तेचा सोपान गाठता येईल.
संजय राऊत यांनी राज्यात(country) पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि महायुती सरकारविरोधात मोर्चा सांभाळला आहे. लोकसभेच्या प्रचारात तर त्यांच्या शब्दांना चांगलीच धार आली होती. पूर्वीपासूनच ते लोकसभेत यावेळी मोठा फेरबदल होईल, असा दावा करत आलेले आहेत. देशातील हवा बदलल्याची त्यांनी यापूर्वीच चर्चा केली होती. मोदींवर त्यांनी तिखट टीकास्त्र सोडले होते. या लोकसभेच्या रणधुमाळीत मोदी अनेक टप्प्यात राज्यात डेरेदाखल झालेले दिसले. यावेळी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी भाजपच्या सत्तेच्या राजकारणाल सुरुंग लावेल, असा दावा राऊतांनी केला होता.
एक्झिट पोलचे दावे त्यांनी सरसकट फेटाळून लावले आहे. त्यांच्या मते देशात एनडीएचे नाही तर इंडिया आघाडीचे सरकार येईल. इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणार असल्याचा दावा त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला. 295 ते 310 जागा इंडिया आघाडीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. त्यांनी एक्झिट पोलवर चांगलेच तोंडसूख घेतले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेच्या रणसंग्रामात 35 हून अधिक जागांवर विजय होईल, असा दावा त्यांनी केला. या जनतेचा महाराष्ट्रातला काय कल आहे त्यांच्या मनात काय आहे हे सॅम्पल सर्वे दूर करत नाही, असे ते म्हणाले. गेले काही दिवस मी ऐकत होतो बारामती मध्ये सुप्रियाताई यांचा पराभव होणार आणि आम्ही खात्रीने सांगत होतो सुप्रियाताई सुळे किमान दीड लाख मताने जिंकतील. शिवसेनेचा 18 चा आकडा कायम राहील. काँग्रेसचा बेस्ट परफॉर्मन्स राहील आणि देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक हे राज्य देशांमध्ये परिवर्तन घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
केळीच्या पानातील अन्न खाण्याचे आहेत ‘हे’ आरोग्यदायी फायदे
कोल्हापुरात शाहू महाराज, हातकणंगलेत सरूडकर? विविध ‘एक्झिट पोल’चा अंदाज
देशात सलग तिसऱ्यांदा मोदी लाट? 3 एक्झिट पोलमध्ये एनडीए 400 पार